या अभिनेत्रीचा चेहरा पाहून भरेल धडकी, तुम्ही ओळखले का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 03:32 PM2021-09-15T15:32:45+5:302021-09-15T15:37:16+5:30

सिनेमात ती पहिल्यांदाच हॉरर भूमिका म्हणजेच एका भुताची भूमिका साकारणार होती. धडकी भरेल असा लूक तिला करावा लागायचा. त्यांसाठी तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागली.

Many failed to recognize this gorgeous actress behind her horror look in this pic, check who is it | या अभिनेत्रीचा चेहरा पाहून भरेल धडकी, तुम्ही ओळखले का ?

या अभिनेत्रीचा चेहरा पाहून भरेल धडकी, तुम्ही ओळखले का ?

Next

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम सध्या चर्चेत आहे. तिचा नुकताच 'भूत पोलीस' हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. यामीने इन्स्टाग्रामवर यामी गौतमने या सिनेमाच्या शूटिंग दरम्यान एक किस्सा शेअर केला आहे, ज्यात तिने सांगितले आहे की तिच्या मानेला दुखापत झाली होती. तिला तयार होण्यासाठी तीन तास लागायचे. सिनेमात ती पहिल्यांदाच हॉरर भूमिका म्हणजेच एका भुताची भूमिका साकारणार होती. धडकी भरेल असा लूक तिला करावा लागायचा. त्यांसाठी तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागली.

यामीने सांगितले की, "मला हॉरर सिनेमा आवडतात, म्हणूनच  मी 'भूत पोलिस' सिनेमात ही भूमिका साकारली आहे. माझ्यासाठी ही भूमिका साकाणे तितके सोपे नव्हते. मला या गेटअपसाठी तीन तासाहून अधिक वेळ लागायचा. रोज मी अनवाणी पायांनी, सगळे स्टंट स्वता: करायची. हिमाचलमध्ये रात्री खूप थंडी असते. त्याचदरम्यान  मला मानेला दुखापत झाली होती पण तरीही मला स्वतःहून काही गोष्टी काही करायच्या होत्या. मनाची तयारी आणि त्यातही योगाभ्यासामुळे मला ते करणे शक्य झाले.

 

यामीने पुढे लिहिले की मला योगामध्येच पुढे आणखी शिकायचे होते. योगा प्रोफेशनल बनायचे होते. पण कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. मी सेटवरही योगा करते. जितकं जमेल तितकं वेळात वेळ काढून नित्यनियमाने करते. 

‘भूत पोलिस’ हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा आहे. या सिनेमात सैफ अली खान, अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.

काही दिवसांपूर्वी सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर चाहत्यांमध्ये हा सिनेमा पाहण्यासाठी कमालीची उत्सुकता निर्माण झाली  होती. सिनेमागृहांमध्ये हा प्रदर्शित होणार होता. पण करोनामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला. डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १० सप्टेंबरला रसिकांच्या भेटीला आला आहे.

सिनेमा पाहून रसिकांनीही संमिश्र प्रतिक्रीया देत असल्याचे पाहायला मिळत आहे. ना धड कॉमेडी, ना धड हॉरर अशा पठडीतला हा सिनेमा असल्याचे रसिक आपले मतं सांगत असल्याचे पाहायला मिळतंय. सिनेमा फारसा रसिकांची पसंती मिळवण्यात यशस्वी ठरला नसला तरी आवडल्या कलाकारांठी हा सिनेमा एकदा पाहायला हरकत नसल्याचेही आपले मत व्यक्त करत आहेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Many failed to recognize this gorgeous actress behind her horror look in this pic, check who is it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app