Manushi Chhillar Shifted In Mumbai For Her Mbbs Study No Chance For Bollywood | मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला अभिनयात नाही तर, 'या' क्षेत्रात करायचे करिअर
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरला अभिनयात नाही तर, 'या' क्षेत्रात करायचे करिअर

मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा होत्या. फराह खान  तिला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार असल्याचे बोलले जात होते. यावर मानुषीने मात्र कधीच आपले मत मांडले नाही.. विशेष म्हणजे मिस वर्ल्ड बनल्यानंतर तिला लवकरच सिनेमा मिळणार असे वाटत होते. मात्र मिस वर्ल्ड किताब पटकावूनसुद्धा मानुषी सिनेमात झळकली नाही. त्यामुळे तिला सतत तिच्या अॅक्टींग डेब्युविषयी विचारले जात होते. मात्र मानुषी सध्या वैद्यकीय शिक्षण घेत आहे. 'मिस वर्ल्ड' हा किताब जिंकल्यानंतर  तिला अभिनयात पदार्पण करायचे नसून शिक्षण पूर्ण करुन हृदयाची डॉक्टर बनायचं आहे. तिची स्वप्न, ध्येय  हे अभिनेत्री  बनण्याचे  नंतर मात्र त्याआधी डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न असल्याचे तिने दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

मिस इंडिया किताब जिंकल्यानंतर माझ्यावरील जबाबदा-या आणखी वाढल्या होत्या. त्यावर पूर्ण लक्ष केंद्रीत करायचं मी ठरवलं होतं. माझ्याप्रमाणेच आधी ब-याच मिस इंडिया होत्या ज्यांनी आपलं शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. मात्र वैद्यकीय शिक्षणातून तुम्हाला जीवनात ब-याच गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव येतो. त्यामुळेच मला माझं वैद्यकीय शिक्षण अपूर्ण सोडायचं नाही. मी काही काळ ब्रेक घेऊन माझ्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करायचं ठरवलं आहे असे तिने म्हटले आहे. तसेच मिस वर्ल्ड संस्थेच्या माध्यमातून जे काही करता येईल ते करायला आवडेल असेही तिने सांगितले.


Web Title: Manushi Chhillar Shifted In Mumbai For Her Mbbs Study No Chance For Bollywood
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.