'ऑफस्क्रीन चांगले नाते असले तरी ते सेटवर असतात बॉस', मनोज वाजपेयीने नीरज पांडेसोबतचा शेअर केला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 07:52 PM2021-04-23T19:52:52+5:302021-04-23T19:53:25+5:30

अभिनेता मनोज वाजपेयी आज ५२वा वाढदिवस साजरा करतो आहे.

Manoj Vajpayee shares his experience with Neeraj Pandey | 'ऑफस्क्रीन चांगले नाते असले तरी ते सेटवर असतात बॉस', मनोज वाजपेयीने नीरज पांडेसोबतचा शेअर केला अनुभव

'ऑफस्क्रीन चांगले नाते असले तरी ते सेटवर असतात बॉस', मनोज वाजपेयीने नीरज पांडेसोबतचा शेअर केला अनुभव

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी आज आपला ५२वा वाढदिवस साजरा करतो आहे. मनोज वाजपेयीने आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.  बॉलिवुडमधल्या अनेक जोड्या एकमेकांसोबतच्या मजबूत सहयोगासाठी नावाजल्या जातात यापैकीच एक आहे मनोज बाजपेयी आणि नीरज पांडे ही अभिनेता-दिग्दर्शकिय जोडी. मागील नऊ वर्ष अगदी घनिष्ठ असलेल्या या जोडीने अनेक प्रकल्पांवर एकत्र काम केले आहे. 

मनोज वाजपेयीने नीरज पांडे आणि फ्रायडे फिल्मवर्क्ससोबत अनेक हिट चित्रपट, माहितीपट आणि लघुपट जसे की, स्पेशल 26, नाम शबाना, अय्यारी, सात उचकै, द सीक्रेट ऑफ सिनौली, मिसिंग सोबत अनेक प्रकल्पांवर काम केले आहे. त्यांचे हे एसोसिएशन खूप जुने आणि घनिष्ठ आहे आणि मनोजला याचा आनंद आहे की त्याला प्रत्येक वेळी या टीमसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.


मनोज वाजपेयी याबद्दल सांगतो की, "स्वत:ला नीरज पांडे आणि फ्रायडे फिल्मवर्क्ससोबत जोडणे, एक टीम, जिच्यासोबत मी नऊ वर्षांहूनही अधिक काळ एकत्र काम केले आहे, त्यांच्यासोबतचा अनुभव हा माझ्यासाठी नेहमीच अतिशय रोमांचक, उत्साहजनक आणि तितकाच विनम्र राहिला आहे. हे नऊ वर्ष जे मी नीरजसोबत काम केले आहे, ते असे चुटकीसरशी गेले आहेत. आम्ही लघुपटांपासून पूर्ण लांबीच्या चित्रपटांपर्यंत सर्व फॉरमॅट आणि शैलींमध्ये एकत्र काम केले आहे”

पुढे मनोज म्हणाला की, "मी नीरजसोबत सेटवर काम करायला तिथल्या हसत्या खेळत्या वातावरणामुळे नेहमीच उत्साहित असतो. आमचे ऑफस्क्रीन खूप चांगले नाते असले तरीही, सेटवर, ते एक असे बॉस असतात की आम्ही सर्वच त्यांना घाबरतो!" 

Web Title: Manoj Vajpayee shares his experience with Neeraj Pandey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.