श्रीदेवीसोबत संधी मिळूनही फ्लॉप झाला सुपरस्टारचा हा मुलगा! आता करतो कॅटरिंगचा व्यवसाय!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2018 07:00 PM2018-07-22T19:00:14+5:302018-07-22T19:03:34+5:30

बॉलिवूडमध्ये असे अनेकजण आहेत, ज्यांना आपल्या आईवडिलांच्या पुण्याईने चित्रपट तर मिळालेत, पण याऊपरही त्यांना आपली ओळख निर्माण करता आली नाही. असाच एक स्टार किड्स म्हणजे, कुणाल गोस्वामी. 

Manoj Kumar's Son Kunal Goswami Flop In Films | श्रीदेवीसोबत संधी मिळूनही फ्लॉप झाला सुपरस्टारचा हा मुलगा! आता करतो कॅटरिंगचा व्यवसाय!!

श्रीदेवीसोबत संधी मिळूनही फ्लॉप झाला सुपरस्टारचा हा मुलगा! आता करतो कॅटरिंगचा व्यवसाय!!

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये असे अनेकजण आहेत, ज्यांना आपल्या आईवडिलांच्या पुण्याईने चित्रपट तर मिळालेत, पण याऊपरही त्यांना आपली ओळख निर्माण करता आली नाही. असाच एक स्टार किड्स म्हणजे, कुणाल गोस्वामी. कुणालने बॉलिवूडमध्ये जम बसवण्याचा बराच प्रयत्न केला़ पण त्याला ते जमले नाही ते नाहीच. पुढे ग्लॅमरच्या जगापासून तो असा काही दूर गेला की आज फार अनेक लोकांना त्याचे नावही स्मरणात नाही.

हा कुणाल गोस्वामी कोण, तर बॉलिवूडचा सदाबहार हिरो आणि भारत कुमार नावाने प्रसिद्ध असलेले अभिनेते मनोज कुमार यांचा चिरंजीव. आपल्या पित्याला पडद्यावर पाहतचं कुणाल मोठा झाला. केवळ इतकेच नाही तर वडिलांच्याच ‘क्रांति’ या चित्रपटात कुणाल बालकलाकार म्हणूनही झळकला. पुढे कुणालनेही याच क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. वडिलांनाही विश्वास असावा, म्हणून त्यांनीही त्याच्या या निर्णयाला पाठिंबा दिला. आपला मुलगा आपले नाव मोठे करेल, कदाचित हे मनोज कुमार यांचे स्वप्न असावे. १९९३ मध्ये ‘कलाकार’ या चित्रपटातून श्रीदेवीचा हिरो बनून कुणालने डेब्यू केला. हा चित्रपट चालला नाही. पण यातील ‘नीले नीले अंबर पर’ या गाण्याने मात्र धूम केली. हे गाणे श्रीदेवी व कुणालवर चित्रीत केले गेले होते. यानंतर कुणाल आणखीही काही चित्रपट मिळाले. घुंघरू, दो गुलाब, पाप की कमाई यासारख्या चित्रपटांत त्याला संधी मिळाली. पण हे चित्रपट फ्लॉप झालेत. 

‘आखिरी बाजी’ या चित्रपटात तो गोविंदासोबत झळकला. पण याचाही फार फायदा झाला नाही. कुणालकडे ना वडिलांसारखे लुक्स होते ना अभिनयाचे अंग. त्यामुळे काही चित्रपटानंतर कुणीच त्याला काम देईनासे झाले. पण मनोज कुमारने पुन्हा एकदा कुणालसाठी चित्रपट काढला. १९९९ मध्ये ‘जय हिंद’ या चित्रपटातून त्यांनी कुणालला रिलॉन्च केले. या चित्रपटात ऋषी कपूर, शिल्पा शिरोडकर असे स्टार्स होते. पण हा चित्रपटही कुणालला तगवू शकला नाही. याच काळात मनोज कुमार यांचे प्रॉडक्शन हाऊसही बंद झाले आणि कुणालचे करिअरही.

अर्थात कुणाल खचला नाही. चित्रपटात आपण टिकाव लागणार नाही, हे वास्तव त्याने स्वीकारले आणि काही वेगळे करण्याचा विचार केला. याच विचाराअंती त्याने कॅटरिंगचा व्यवसाय सुरू केला.

 

 

Web Title: Manoj Kumar's Son Kunal Goswami Flop In Films

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.