man asks chinmayi sripada for adult pictures singer destroys him with epic reply | त्याने मागितले न्यूड फोटो; गायिकेने स्क्रिनशॉट शेअर करत दिले असे उत्तर!!
त्याने मागितले न्यूड फोटो; गायिकेने स्क्रिनशॉट शेअर करत दिले असे उत्तर!!

ठळक मुद्दे चिन्मयी श्रीपदा हिनेही मीटू  मोहिमेअंतर्गत आपली कहाणी जगापुढे आणली होती.

इंटरनेटची दुनिया कधीकधी सेलिब्रिटींना नकोशी होते. याचे कारण म्हणजे ट्रोलिंग. विशेषत: बॉलिवूडमधील महिला सेलिब्रिटींना अनेकदा त्यांचे शरीर, फॅशन सेन्स, लूक आणि अशा कित्येक गोष्टींवरून अश्लिल कमेंट्स ऐकावे लागतात. सोशल मीडियाने आपल्याला आपल्या आवडत्या कलाकारांच्या जवळ आणले आहे. पण काही लोक याचा गैरफायदा घेताना दिसतात. सध्या असेच एक प्रकरण समोर आले आहे. होय, साऊथची लोकप्रिय गायिका चिन्मयी श्रीपदा हिच्याकडे एका सोशल मीडिया युजरने आक्षेपार्ह मागणी केली. Mk_the_don नावाचे  प्रोफाईल असलेल्या या व्यक्तिने चिन्मयीला तिचे न्यूड फोटो मागितले.  यावर शांत बसण्याऐवजी चिन्मयीने न्यूड फोटो मागणा-या या आंबट शौकिन चाहत्याला वेगळ्या भाषेत उत्तर दिलेत.
 तिने काय केले तर, तिने तिच्या न्यूड लिपस्टिकचे फोटो शेअर केलेत. ‘थोडेसे मनोरंजन...ज्या लिपस्टिकचा कलर मानवी शरीराच्या रंगाशी मॅच करतो, त्याला न्यूड लिपस्टिक म्हणतात. जाणकारांच्या मते, न्यूड लिपस्टिकच्या कॅटेगरीत २०-३० स्किन टोनचे वेगवेगळे शेड्स येतात...,’ असे तिने लिहिले. चिन्मयीचे हे उत्तर पाहून न्यूड फोटो मागणाºया त्या युजरची बोलती बंद झाली. शेवटी त्याने त्याचे अकाऊंटच डिलीट करून टाकले.


 चिन्मयी श्रीपदा हिनेही मीटू  मोहिमेअंतर्गत आपली कहाणी जगापुढे आणली होती. तामिळ कवी, गीतकार आणि लेखक वैरामुत्तु यांच्यावर तिने गैरवर्तनाचे आरोप केले होते.
 १९ वर्षांची असताना मी माझ्या आईसोबत एका अतिशय दिग्गज व्यक्तिला भेटायला गेले होते. माझी आई माझ्यासोबत होती. पण प्रत्यक्षात मला एकटीलाचं आत बोलवण्यात आले. मला फार आश्चर्य वाटले नाही. मी बेधडकपणे एकटीच खोलीत गेले. पण गेल्या गेल्या त्या व्यक्तिने मला अलिंगण दिले. मी त्याच्या तावडीतून निसटून बाहेर पडायला लागले असता त्याने माझा फोन आणि बॅग पकडून घेतली. या घटनेनंतर अनेक दिवस मी अस्वस्थ होते. ही व्यक्ती दुसरी कुणी नाून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित तामिळ कवी, गीतकार व लेखक वैरामुत्तु आहेत,’असे चिन्मयी श्रीपदाने ट्विटरवर लिहिले होते.


 


Web Title: man asks chinmayi sripada for adult pictures singer destroys him with epic reply
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.