‘गर्लफ्रेन्ड’ बनायला दिला नकार, म्हणून ‘मर्डर गर्ल’ने गमावल्या अनेक भूमिका !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 08:00 AM2019-06-29T08:00:00+5:302019-06-29T08:00:02+5:30

मल्लिका शेरावत अनेक वर्षांनंतर अभिनेता तुषार कपूरसोबत दिसणार आहे. एकता कपूरच्या ‘बू, सबकी फटेकी’ या वेब सीरिजमध्ये मल्लिकाची वर्णी लागली आहे. पण इतकी वर्षे ही मर्डर गर्ल कुठे होती? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर खुद्द मल्लिकानेच याचे उत्तर दिलेय.

mallika sherawat shocking interview dark side of industry | ‘गर्लफ्रेन्ड’ बनायला दिला नकार, म्हणून ‘मर्डर गर्ल’ने गमावल्या अनेक भूमिका !

‘गर्लफ्रेन्ड’ बनायला दिला नकार, म्हणून ‘मर्डर गर्ल’ने गमावल्या अनेक भूमिका !

googlenewsNext
ठळक मुद्देमल्लिकाची ‘बू, सबकी फटेकी’ ही वेबसीरिज एक हॉरर कॉमेडी आहे.

मल्लिका शेरावत अनेक वर्षांनंतर अभिनेता तुषार कपूरसोबत दिसणार आहे. एकता कपूरच्या ‘बू, सबकी फटेकी’ या वेब सीरिजमध्ये मल्लिकाची वर्णी लागली आहे. याद्वारे मल्लिकाचा डिजिटल डेब्यू होतोय. साहजिकच, हा डेब्यू तिच्यासाठी खास आहे. पण इतकी वर्षे ही मर्डर गर्ल कुठे होती? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर खुद्द मल्लिकानेच याचे उत्तर दिलेय. होय, स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत मल्लिकाने एक धक्कादायक खुलासा केला.

अनेक भूमिका मी घालवल्या, असे ती म्हणाली. यामागचे शॉकिंग कारणही तिने सांगितले. ‘मी अनेक चित्रपटांतील भूमिका गमावल्या. या भूमिका मला आवडल्या नव्हत्या, असे नाही तर केवळ मी त्या त्या चित्रपटाच्या हिरोला डेट करत नव्हते, म्हणून मला या भूमिका नाकारण्यात आल्या. इंडस्ट्रीत बहुतांश हिरो, डायरेक्टर व प्रोड्यूसर आपल्या गर्लफ्रेन्डसोबत काम करू इच्छितात. मी कुणाचीही गर्लफ्रेन्ड बनायला तयार नव्हते. त्यामुळे मला अनेक चित्रपटांतून काढून टाकण्यात आले,’ असे ती म्हणाली.

मीटू मोहिमेवरही ती बोलली. ‘इंडस्ट्रीत मला कुणीही सेक्शुअल फेवर मागितला नाही. याचे कारण एकच होते. ते म्हणजे मी एक बोल्ड पर्सनॅलिटी आहे. मला असे विचारण्याची हिंमत कुणी करू श्कत नाही. मीटू मोहिम एक सकारात्मक पाऊल आहे,’ असे ती म्हणाली.

मल्लिकाची ‘बू, सबकी फटेकी’ ही वेबसीरिज एक हॉरर कॉमेडी आहे. यात तुषार व मल्लिकाशिवाय कॉमेडियन कृष्णा अभिषेक, किकू शारदा, शेफाली जरीवाला असे अनेक कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. या वेबसीरिजमध्ये मल्लिका हसीना नामक मुलीची भूमिका साकारते आहे.

Web Title: mallika sherawat shocking interview dark side of industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.