सेलिब्रिटी आहेस म्हणून कसंही वागणार का? मलायकाचा व्हिडीओ पाहून युजर्सची सटकली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 11:34 AM2021-07-30T11:34:41+5:302021-07-30T11:36:03+5:30

मलायका अरोरा सतत चर्चेत असते. कधी रिलेशनशिपमुळे तर कधी तिच्या जिम बाहेरच्या फोटोंमुळे. सध्या मलायकाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

malaika arora troll on her hot and bold sports bra and shorts | सेलिब्रिटी आहेस म्हणून कसंही वागणार का? मलायकाचा व्हिडीओ पाहून युजर्सची सटकली

सेलिब्रिटी आहेस म्हणून कसंही वागणार का? मलायकाचा व्हिडीओ पाहून युजर्सची सटकली

googlenewsNext
ठळक मुद्दे सध्या मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघेही अनेकदा एकत्र फिरताना दिसतात.

मलायका अरोरा ( Malaika Arora) सतत चर्चेत असते. कधी रिलेशनशिपमुळे तर कधी तिच्या जिम बाहेरच्या फोटोंमुळे. सध्या मलायकाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. साहजिकच हा व्हिडीओ तिच्या योगा क्लासबाहेरचा. मलायका क्लासमधून बाहेर पडली आणि पापाराझींचे कॅमेरे तिच्यावर रोखले गेलेत. याचा एक व्हिडीओ इन्स्टा बॉलिवूडने शेअर केला आणि हा व्हिडीओ पाहून लोकांनी तिला ट्रोल करायला सुरूवात केली.
व्हिडिओत मलायका हातात पाण्याची बॉटल आणि एक बॉक्स दिसतो. योगा क्लासमधून बाहेर पडून मलायका थेट कारमध्ये बसते. ती गेटच्या बाहेर पडताच रस्त्यावरच्या प्रत्येकाची नजर मलायकावर रोखली जाते. मलायका घाईघाईत आपल्या कारमध्ये बसते आणि बसता बसता कॅमेरालासुद्धा हात उचलून प्रतिसाद देते.

 या व्हिडीओमध्ये मलायकाने स्पोर्ट्स ब्रा आणि शॉट्स घातले आहेत आणि नेमक्या याच कारणावरून युजर्स तिला ट्रोल करताहेत.
 किमान बाहेर पडतांना तरी पूर्ण कपडे घालत जा, सुंदर दिसशील आणि लोकांच्या कमेंट्सपासूनही वाचशील, असे एका युजरने मलायकाच्या या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिले.

सेलिब्रिटी आहेस म्हणून का बिना कपड्यांची बाहेर फिरशील? समाजाला आणि लहान मुलांना तू काय शिकवण देणार आहे? असा खरपूस सवाल एका युजरने विचारला.

पन्नाशीत असूनही हिला कपडे घालायचा अजिबात सेन्स नाही, अशी कमेंट एका युजरने केली.  
 जिम आऊटफिटवरून ट्रोल होण्याची तशी मलायकाची ही पहिली वेळ नाही. याआधीही अनेकदा याच कारणाने ती ट्रोल झालीये. पण याची पर्वा करेल ती मलायका कुठली? सध्या मलायका अर्जुन कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. दोघेही अनेकदा एकत्र फिरताना दिसतात. त्यांचे नाते आता त्यांच्या कुटुंबीयांनीही स्वीकारले आहे. अरबाज खानसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाने अर्जुन कपूरसोबतचे नाते आॅफिशिअल केले होते.
 
 

Web Title: malaika arora troll on her hot and bold sports bra and shorts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.