ठळक मुद्दे मलायकाला वारंवार हॉस्पिटलच्या फेऱ्या लगावताना दिसतेयमलायकाने यावेळी मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर पोझ देणं टाळले आहे

मलायका अरोरा नेहमीच सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असते. फॅन्ससोबत ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. हॉट फोटोंमुळे मलायका चर्चेत असते मात्र सध्या मलायकाचे हॉस्पिटल बाहेरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतायेत. या फोटोंमध्ये मलायका हॉस्पिटलच्या बाहेर दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून मलायकाला वारंवार हॉस्पिटलच्या फेऱ्या लगावताना दिसतेय. यावेळी मलायका थेट जीममधून हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याचे तिच्या कपड्यांवरून दिसतंय. 


मलायकाचे हॉस्पिटलमध्ये जाण्यामागचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. मलायकाच्या वारंवार हॉस्पिटलच्या फेऱ्या पाहून आता तिचे चाहतेदेखील चिंतेत नक्कीच असतील. त्यामुळे नेमकं मलायका येथे कोणाची भेट घेण्यासाठी येते ? की तिची तब्येत ठिक नाहीय? याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मलायकाने यावेळी मीडियाच्या कॅमेऱ्यांसमोर पोझ देणं ही टाळले आहे. मीडियाशी काहीही न बोलताच ती गाडीत जाऊन बसली.   


एप्रिल महिन्यात मलायका सोबत अर्जुन कपूरला सुद्धा लिलावती हॉस्पिटलच्या बाहेर स्पॉट झाला होता. त्यानंतर उलटं सुलटं चर्चांना उधाण आलं होतं. मात्र यावेळी मलायका एकटीच दिसली. गेल्या अनेक महिन्यांपासून मलायका आणि अर्जुनच्या लग्नाची चर्चा आहे.

अर्जुन आणि मलायकाने त्यांचे नाते मीडियापासून का लपवले नाही याविषयी देखील अर्जुनने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. त्याने म्हटले होते की, आम्ही मीडियासमोर येण्याचा विचार केला कारण आम्हाला वाटलं, मीडिया आमच्या नात्याचा आदर करत आहे. ते आमच्यासोबत अतिशय चांगल्या प्रकारे वागत असल्यानेच आम्ही मीडियासमोर एकत्र येण्याचे ठरवले. 


Web Title: Malaika arora spotted at hospital again
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.