malaika arora shares shooting experience of dil se song chhaiya chhaiya | OMG! अशा अवस्थेत मलायका अरोराने पूर्ण केले होते ‘छय्या छय्या’चे शूटींग!
OMG! अशा अवस्थेत मलायका अरोराने पूर्ण केले होते ‘छय्या छय्या’चे शूटींग!

ठळक मुद्देमलायकाने काही दिवसांपूर्वी आपल्या रिलेशनशीपबाबत खुलासा केला होता.

मलायका अरोरा सध्या तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. अर्जुन कपूरसोबतचे लव्ह अफेअर आणि गर्ल गँगसोबतची धम्माल मस्ती हेच काय मलायका चर्चेत राहण्याचे विषय. आताही ती आपल्या गर्ल गँगसोबत मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करतेय. अर्थात यापूर्वी मलायकाने ‘डीआयडी’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोचे शूटींग पूर्ण केले. यावेळी मलायकाने एक किस्सा शेअर केला. कदाचित चाहत्यांना हा किस्सा माहित नसावा.
हा किस्सा आहे ‘दिल से’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा. आता ‘दिल से’ हा चित्रपट आठवल्यावर यातले मलायकाचे ‘छय्या छय्या’ हे गाणे आठवतेच. या गाण्याच्या वेळचा अनुभव मलायकाने शेअर केला.

‘दिल से’ या चित्रपटावेळी मी खूप नर्व्हस होते, असे तिने सांगितले. पुढे तिने सांगितले की,  चित्रपटाचे दिग्दर्शक मणिरत्नम, संतोष सिवन आणि शाहरूख खान यांच्यापुढे मी स्वत:ला कमी लेखू लागले होते. पण टीमने मला इतके प्रेम दिले की, मी सगळे काही विसरले. ट्रेनवर नाचताना सुरक्षेसाठी माझ्या कमरेवर एक दोरी बांधली होती आणि त्या दोरीचे दुसरे टोक ट्रेनला बांधले गेले होते. अचानक ही दोरी खेचली गेली आणि माझ्या कमरेचा भाग कापला गेला. त्यातून रक्त वाहू लागले. अशास्थितीत टीममधील सर्वांनीच माझी काळजी घेतली.

मलायकाने काही दिवसांपूर्वी हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदा आपल्या रिलेशनशीपबाबत खुलासा केला होता. जेव्हा माझे लग्न तुटले तेव्हा मी पुन्हा कोणत्या रिलेशनशीपमध्ये पडेन, असे मला वाटले नव्हते. मी नात्यात पडले तर माझे मन पुन्हा दुखावेल, ही भीती माझ्या मनात होती. पण खरे सांगू तर मला एक रिलेशनशीप हवे होते आणि मला ते मिळाले. मी आता खूप आनंदी आहे, असे अर्जुन कपूरचे नाव न घेता ती म्हणाली होती.


Web Title: malaika arora shares shooting experience of dil se song chhaiya chhaiya
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.