मलायका आरोराने बनवले बेसनचे लाडू , तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 02:45 PM2020-04-02T14:45:18+5:302020-04-02T14:47:08+5:30

छैय्या छैय्या गर्ल मलायका अरोरा नेहमीच तिच्या वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटोमुळे इतरांना प्रेरणा देत असते.

Malaika Arora Makes 'Besan ke Laddoo', Fans Shower Her with Praises-SRJ | मलायका आरोराने बनवले बेसनचे लाडू , तुम्ही पाहिले का?

मलायका आरोराने बनवले बेसनचे लाडू , तुम्ही पाहिले का?

googlenewsNext

लॉकडाऊनमुळे चित्रीकरण  बंद  झाल्याने नेहमी व्यस्त असणाऱ्या कलाकारांना स्वतःसाठी थोडा मोकळा वेळ मिळालेला आहे.  त्यामुळे बॉलिवूडच्या मुन्नीदेखील  हा वेळ सत्कारणी लावायचा निश्चय केलेला आहे. ती जे काही करते त्यात काही ना काही खासियत असतेच. तिचा व्हायरल झालेल्या फोटोत याची प्रचिती येईल. आवडीचे अनेक खाद्यपदार्थ करण्यात वेळ घालवण्याचे तिने ठरवले आहे.  काही दिवसांपूर्वीच ती किचनमध्ये काम करताना दिसली होती. आता तर तिने थेट बेसनाचे लाडू बनवताना व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अतिशय मन लावून ती गोल गोल लाडू बनवण्याचा प्रयत्न करते. हा व्हिडीओ पाहून तिचे चाहत्यांना मात्र झिपेला पाणीच सुटले आहे. पहिल्यांदाच मलायकाला घरात काम करताना पाहून अनेकजण थक्कच होत आहेत. मलायकाला अभिनया व्यतिरिक्त जेवण बनवण्याची खूप आवड असल्याचे यामुळे समोर आले आहे. एरव्ही फक्त फिटनेस टीप्स देणारी मलायका आज कुक देखील बनली आहे. मलायकाचे बेसनाचे लाडू बनवतानाचे हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप हिट झालेले पाहायला मिळत आहेत.

 

छैय्या छैय्या गर्ल मलायका अरोरा नेहमीच तिच्या वर्कआऊट व्हिडीओ आणि फोटोमुळे इतरांना प्रेरणा देत असते. ती  फिटनेस फ्रिक आहे हे जगजाहीर आहे. तिचे अनेक फोटो पाहून ती खूप चोखदंड असल्याचे पाहायला मिळते.  फोटोत ती वरं
डोकं खाली पाय अशा रितीने वर्कआऊट करताना पाहायला मिळत आहे.

वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही मलायकाचे फिटनेस प्रेम पाहून भल्या भल्यांची बोलती बंद नाही झाली तरच नवल. तिचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून यावर खूप सारे कमेंटस आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. 45 वर्षांच्या  वयातही स्वत:ला खूप चांगले फिट ठेवले आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा बिकिनी अवतार तिने शेअर केला होता तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना कमालीचा आवडला असून काहीच तासांत या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले आहेत. तुर्तास मलायका हा
नवीन वर्कआऊट फोटो इतरांनाही प्रेरणा देईल हे मात्र नक्की. उत्तम आरोग्याचा कानमंत्र देणा-या मलायकाने या वर्षात काही तरी वेगळं करण्याचं ठरवलंय.. मात्र त्यासाठी तिच्या फॅन्सना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

Web Title: Malaika Arora Makes 'Besan ke Laddoo', Fans Shower Her with Praises-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.