ठळक मुद्देअगदी अलीकडे मलायकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अर्जुनने तिला किस करतानाचा फोटो शेअर केला होता.

मलायका अरोराअर्जुन कपूर लवकरच लग्नबेडीत अडकणार, अशी अनेक महिन्यांपासून चर्चा आहे. अर्थात अद्याप या चर्चेला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. पण हो, या लग्नाचे प्लॅनिंग मात्र तयार आहे. होय, अगदी लग्न कुठे होणार, या लग्नात मलायका कुण्या डिझाईनरने डिझाईन केलेला ड्रेस घालणार, हे सगळे ठरलेय. खुद्द मलायकाने तिच्या ड्रिम वेडिंगबद्दल खुलासा केला आहे.


नेहा धुपियाच्या चॅट शोमध्ये मलायकाने अर्जुनसोबतच्या तिच्या ड्रिम वेडिंगबद्दल सांगितले. तिने सांगितले की, माझे ड्रिम वेडिंग बीचवर होणार आणि हे एक व्हाईट वेडिंग असेल. लग्नात मला elie saab gown घालायला आहे. माझी गर्लगँग माझी ब्राईड्समेट असेल. ब्राईड्समेटची प्रथा मला मनापासून आवडते.


अर्जुनबद्दलही मलायका बोलली. मी त्याचे चांगले फोटो घेत नाही, असे अर्जुनला वाटते. तो मात्र माझे बेस्ट फोटो क्लिक करतो, हेही तिने सांगितले.
मलायका घटस्फोटित आहे. शिवाय तिच्यापेक्षा अर्जुन  11 वर्षांनी लहान आहे. याऊपरही अर्जुन व मलायका यांची लव्हस्टोरी बहरली. दोघांनीही मालदीव व्हॅकेशनचे फोटो शेअर करत, या नात्याची जाहीर कबुली दिली होती. या फोटोत मलायका व अर्जुन एकमेकांचा हात हातात घेऊन दिसले होते. याशिवाय दोघांच्या न्यूयॉर्क व्हॅकेशनचे फोटोही व्हायरल झाले होते.

अगदी अलीकडे मलायकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत अर्जुनने तिला किस करतानाचा फोटो शेअर केला होता. यानंतर तर दोघांच्याही नात्यावर जणु शिक्कामोर्तब झाले होते. तेव्हापासून या कपलच्या लग्नाच्या बातम्या चर्चेत आहेत. अर्थात अर्जुन व मलायका लग्नाच्या बातम्या अफवा असल्याचे सांगत आहेत.

Web Title: malaika arora dream wedding with arjun kapoor would look like

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.