मलायका अरोराने अर्जुन कपूरला दिले अनोखे चॅलेंज, पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 11:42 AM2019-09-25T11:42:27+5:302019-09-25T11:42:52+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘फिट इंडिया मुव्हमेंट’ची सध्या जोरदार चर्चा आहे. अशात फिटनेस म्हटल्यावर बॉलिवूडकर कसे मागे राहणार?

malaika arora complete make your moov challange and tag arjun kapoor |  मलायका अरोराने अर्जुन कपूरला दिले अनोखे चॅलेंज, पाहा व्हिडीओ

 मलायका अरोराने अर्जुन कपूरला दिले अनोखे चॅलेंज, पाहा व्हिडीओ

googlenewsNext
ठळक मुद्देमलायकाने दिलेले चॅलेंज रकुल प्रीतने लगेच स्वीकारले आणि सोफ्याच्या मदतीने पुशअप्स मारतानाचा एक व्हिडीओ शेअर केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या ‘फिट इंडिया मुव्हमेंट’ची सध्या जोरदार चर्चा आहे. अशात फिटनेस म्हटल्यावर बॉलिवूडकर कसे मागे राहणार? त्यांनी  यात उडी घेतली आहे. केवळ इतकेच नाही तर यासाठी #MakeYourMoov  नावाचे एक अनोखे चॅलेंज सुरू केले आहे. या चॅलेंजमध्ये करायचे काय तर एक अतिशय साधीसोपी मूव्ह व्हिडीओद्वारे चाहत्यांशी शेअर करायची आणि हे चॅलेंज स्वत:सोबत अनेकदांना द्यायचे. सध्या अमेरिकेत असलेली बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री मलायका अरोराने हिने सुद्धा हे चॅलेंज स्विकारले आहे.


होय, मलायका अरोराने तिच्या सोशल अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती तिची सर्वात सोपी मूव्ह करताना दिसत आहे. या मूव्हसाठी जीमची गरज नाही. घरीदारी कुठेही अगदी सहज करता येईल अशी ही मूव्ह आहे. मलायकाने ही मूव्ह करत, चॅलेंज पूर्ण केले. ‘मी  चॅलेंज पूर्ण केले. जे FitIndiaMovementचा भाग आहे. आता मी हृतिक रोशन, रकुल प्रीत, टायगर श्रॉफ आणि अर्जुन कपूर यांना हे चॅलेंज देत आहे,’ असे हा व्हिडीओ शेअर करताना मलायकाने लिहिले.


विशेष म्हणजे, मलायकाने दिलेले हे चॅलेंज रकुल प्रीतने लगेच स्वीकारले आणि सोफ्याच्या मदतीने पुशअप्स मारतानाचा एक व्हिडीओ शेअर केला. अर्जुन कपूरने अद्याप मलायकाचे हे चॅलेंज स्वीकारलेले नाही. त्यामुळे आपल्या ‘लेडी लव्ह’ने दिलेले चॅलेंज तो कसे पूर्ण करतो, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून अर्जुन कपूर व मलायका अरोरा यांच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु आहे. लवकरच हे कपल लग्न करणार, असेही मानले जात आहे.

Web Title: malaika arora complete make your moov challange and tag arjun kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.