'डोनाल्ड डकची आठवण आली'; विचित्र पद्धतीने चालल्यामुळे मलायका ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 11:13 AM2021-10-12T11:13:06+5:302021-10-12T11:13:54+5:30

Malaika arora: सोशल नेटवर्किंगवर अनेकदा मलायकाचे जीमच्या बाहेरील फोटो व्हायरल होत असतात. तिचे हे फोटो पाहिल्यावर अनेकदा चाहते तिच्या फिटनेसचं कौतुक करतात.

malaika arora brutally trolled for the way she walked in viral video | 'डोनाल्ड डकची आठवण आली'; विचित्र पद्धतीने चालल्यामुळे मलायका ट्रोल

'डोनाल्ड डकची आठवण आली'; विचित्र पद्धतीने चालल्यामुळे मलायका ट्रोल

googlenewsNext
ठळक मुद्देगेल्या काही दिवसांपासून मलायका तिच्या विचित्र चालण्याच्या पद्धतीमुळे ट्रोल होताना दिसत आहे.

'वय हा निव्वळ आकडा आहे', असं अनेकदा अभिनेत्री मलायका अरोराकडे (malaika arora) पाहिल्यावर म्हटलं जातं. कलाविश्वाप्रमाणेच (bollywood) मलायका सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा ती चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत असते. सोशल नेटवर्किंगवर अनेकदा मलायकाचे जीमच्या बाहेरील फोटो व्हायरल होत असतात. तिचे हे फोटो पाहिल्यावर अनेकदा चाहते तिच्या फिटनेसचं कौतुक करतात. परंतु, गेल्या काही दिवसांपासून मलायका तिच्या विचित्र चालण्याच्या पद्धतीमुळे ट्रोल होताना दिसत आहे.  सध्या मलायकाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात तिची चाल पाहिल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल करत डोनाल्ड डकची आठव आल्याचं म्हटलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'इंस्टंट बॉलिवूड' या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मलायका तिच्या कारमधून खाली उतरतांना दिसते. त्यानंतर तिने कारच्या थोडं पुढे येऊन फोटोग्राफर्सला पोझ दिली. मात्र, यावेळी मलायका ज्या पद्धतीने चालत होती. ते पाहुन अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे. 

'हे कुठल्या पद्धतीचं चालणं आहे', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, 'अशा पद्धतीने काय चालते आहेस?', 'कॅमेरा पाहून मुद्दाम अशी चालते वाटतं', 'मला तर हिचं चालणं पाहून डोनाल्ड डकचीच आठवण येतीये', अशा अनेक कमेंट्स करुन नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.

दरम्यान, यापूर्वीदेखील अनेकदा मलायकाला तिच्या चालण्यावरुन ट्रोल करण्यात आलं आहे. द कपिल शर्मा शो च्या मंचावरदेखील गीता कपूरने मलायकाच्या चालण्याची खिल्ली उडवली होती.  सध्या मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत येत असून त्याला ४१ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.
 

Web Title: malaika arora brutally trolled for the way she walked in viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.