Malaika Arora And Arjun kapoor Spotted Together At Airport See Pics | पुन्हा एकदा मलायका आणि अर्जुन निघाले व्हॅकेशनवर, तर एअरपोर्टवर पाहायला मिळाला स्टनिंग लूक

पुन्हा एकदा मलायका आणि अर्जुन निघाले व्हॅकेशनवर, तर एअरपोर्टवर पाहायला मिळाला स्टनिंग लूक

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर सगळ्यात जास्त चर्चेत असणारे कपल आहेत. त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या खाजगी गोष्टींमुळेच ते जास्त चर्चेत असतात. आता दोघेही पुन्हा एकदा व्हॅकेशनसाठी गेले आहेत. त्यांचे दोघांचे फोटो व्हायरल झाले आहेत. एयरपोर्टवर दोघे एकत्र दिसले त्यामुळे ते व्हॅकेशनसाठी गेल्याचे बोलले जात आहे. यावेळी मलायका खूप रिलॅक्स दिसत होती. यावेळी तीने लेदर पँट आणि प्रिंटेड टॉप परिधान केला होता. 
यावेळी मलायकाचा खूप स्टनिंग लूक पाहायला मिळाला. तर अर्जुन कपूरही काळ्या रंगाच्या लेदर जॅकेट परिधान केला असून खूप स्टायलिश लूक पाहायला मिळाला. तुर्तास दोघे कुठे गेले आहेत याविषयी तर्कवितर्क लावले जात आहेत. आता त्यांचे व्हॅकेशन फोटो समोर आल्यावर लोकेशनची माहिती मिळेल. 


अर्जुन कपूरच्या वाढदिवसादिवशी मलायकाने सोशल मीडियावर फोटो शेअर करून त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली. त्यानंतर ते दोघे न्यूयॉर्कमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेले होते. तिथले फोटोदेखील सोशल मीडियावर पाहायला मिळाले. हे फोटो खूप व्हायरल झाले होते.  सुरुवातीला त्यांनी त्यांच्या नात्याबाबत मौन राखणेच पसंत केले होते. ते दोघे अनेकवेळा एकत्र दिसत असून ते मीडियासमोर फोटोसाठी एकत्र पोझ देखील देत असत. त्यामुळे त्यांच्या अफेअर हे आता जगजाहीर झाले आहे.


एकीकडे अर्जुन कपूरसह रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे मलायका चर्चेत आहे तर दुसरीकडे मलायकाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये मलायका, अरबाज आणि त्यांचा मुलगा अरहानचा एक जुना फोटो पोस्ट केला असून या फोटोत ते तिघेही खूपच छान दिसत आहेत. हा फोटो पोस्ट करून अरबाज आणि अरहानमध्ये खूप साऱ्या गोष्टीत साम्य असल्याचे तिला सांगायचे असल्याचे या फोटोच्या कॅप्शनमधून आपल्याला जाणवत आहे. तिने या फोटोसोबत लिहिले आहे की, अरहान तू अगदी तुझ्या वडिलांची कॉपी आहेस.

Web Title: Malaika Arora And Arjun kapoor Spotted Together At Airport See Pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.