mahi gill regrets working in salman khan film dabangg | माही गिलला होतोय सलमान खानचा चित्रपट काम केल्याचा पश्चाताप! वाचा कारण!!
माही गिलला होतोय सलमान खानचा चित्रपट काम केल्याचा पश्चाताप! वाचा कारण!!

सलमान खानच्या चित्रपटात काम केल्याचा एखाद्या अभिनेत्रीला पश्चाताप होऊ शकतो का? या प्रश्नाचे उत्तर ‘हो’ असेही असू शकते. खरे तर सलमानसोबत काम करण्याची संधी मिळावी, असे प्रत्येक अभिनेत्रीचे स्वप्न असते. पण होय, अभिनेत्री माही गिल हिला राहून राहून सलमानसोबत काम का केले, याचा पश्चाताप होतोय. केवळ इतकेच नाही तर सलमानसोबत काम करून आपल्या करिअरचा ओहोटी लागली, असेही तिचे म्हणणे आहे.
माहीने अनुराग कश्यपच्या ‘देव डी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपला धाक जमवला होता. या चित्रपटानंतर माही ‘दबंग’ या चित्रपटात एक छोटीशी भूमिका करताना दिसली होती. अरबाज खानच्या पत्नीची भूमिका तिने यात साकारली होती, पण ही भूमिका केली आणि या भूमिकेनंतर जणू माहीच्या करिअरला ग्रहण लागले. अलीकडे एका ताज्या मुलाखतीत माही याबद्दल उघडपणे बोलली. ‘देव डी’ या चित्रपटातील माझ्या भूमिकेचे बरेच कौतुक झाले होते. मला अनेक पुरस्कारही मिळालेत. पण ‘दबंग’मध्ये काम केल्यानंतर सगळ्याच गोष्टी उलट्या घडायला लागल्या. निर्माते-दिग्दर्शक मला अगदीच छोट्या भूमिका आॅफर करू लागलेत. मला खूप वाईट वाटले. असे का होतेय, हेच मला कळनासे झाले.   ‘दबंग’मध्ये काम केल्यानंतर माझे करिअर पूर्णपणे थांबले. ‘दबंग2’मध्ये मला काम करायचे नव्हते. पण अरबाजच्या शब्दाखातर मी हा चित्रपट केला, असे माही म्हणाली. अर्थात आत्ता मी याबद्दल विचार करत नाही़ नशीबातचं तसे लिहिलेल असावे, असेही ती म्हणाली.
लवकरच माही गिल तिग्मांशू धूलियाच्या ‘साहेब बीवी और गँगस्टर3’ या चित्रपटात दिसणार आहे. दीर्घकाळानंतर हा चित्रपट मिळाल्याने माही सुखावली आहे. सध्या तरी ती तिग्मांशू धूलिया यांचे आभार मानताना थकत नाहीये. ‘साहेब बीवी और गँगस्टर’ या साीरिजचे दोन्ही चित्रपट हिट झाले होते. या दोन्ही सीरिजमध्ये माही गिल लीड रोलमध्ये दिसली होती. आता या सीरिजचा तिसरा चित्रपट येतोय. साहेब तुरुंगात गेल्यावर त्याची सगळी सत्ता त्याची पत्नी म्हणजे माही गिलच्या हातात येते, असे याचे कथानक असणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. यात संजय दत्त गँगस्टरच्या भूमिकेत दिसला. पहिल्या पार्टमध्ये ही भूमिका रणदीप हुड्डाने स्तर दुसऱ्या भागात इरफान खानने साकारली होती. 


Web Title: mahi gill regrets working in salman khan film dabangg
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.