हा दाक्षिणात्य अभिनेता बॉलिवूड स्टारपेक्षाही घेतो अधिक मानधन, लागोपाठ तीन चित्रपट दिले आहेत हिट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 03:48 PM2020-04-13T15:48:00+5:302020-04-13T15:50:02+5:30

हा अभिनेता गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

mahesh babu taking highest fees in south industry PSC | हा दाक्षिणात्य अभिनेता बॉलिवूड स्टारपेक्षाही घेतो अधिक मानधन, लागोपाठ तीन चित्रपट दिले आहेत हिट

हा दाक्षिणात्य अभिनेता बॉलिवूड स्टारपेक्षाही घेतो अधिक मानधन, लागोपाठ तीन चित्रपट दिले आहेत हिट

googlenewsNext
ठळक मुद्देमहेश बाबू दक्षिण भारतात जाहिरात क्षेत्रातील किंग ठरला असून प्रसिद्धीच्या तुलनेत इतर कोणी अभिनेता त्याच्या आसपास देखील नाही आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार महेश बाबूच्या चाहत्यांची संख्या दिवसागणिक वाढत असून सद्यस्थितीला महेश बाबू अनेक प्रतिष्ठित ब्रँडचा चेहरा आहे. आपल्या याच विशाल फॅन बेसमुळे महेश बाबू दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. अनेक ब्रँडचा चेहरा असण्यासोबतच त्याचे मागचे तीनही सिनेमे बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड तोड़ हिट ठरले आहेत. महेश बाबू दक्षिणेतला सर्वात मोठा आणि सर्वात यशस्वी तेलुगु फिल्मस्टार असून उत्तर भारतात देखील आपल्या लोकप्रियतेचा उच्चांक कायम ठेवत पॅन-इंडिया सुपरस्टार बनला आहे. 

महेश बाबूचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा 'सरिलरु नीकेवरु' ने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. हा चित्रपट 100 करोड़चा आकड़ा गाठणारा महेश बाबूचा लागोपाठ तिसरा सिनेमा ठरला आहे. यामध्ये प्रथमच महेश बाबू एका सेना अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता. महेश बाबूला मिळणारे चाहत्यांचे प्रेम आणि कौतुक प्रचंड आहे. फिल्म 'महर्षि' ने चाहत्यांना खिळवून ठेवले होते.  हा चित्रपट थिएटरमध्ये सुपरहिट ठरला होता... हीच गोष्ट त्याच्या 'भारत एएन नेनु'ची आहे, ज्यातील त्याच्या अभिनयाने दर्शकांना मंत्रमुग्ध केले होते. 

यासोबतच, दुसऱ्या बाजूला महेश बाबू दक्षिण भारतात जाहिरात क्षेत्रातील किंग ठरला असून प्रसिद्धीच्या तुलनेत इतर कोणी अभिनेता त्याच्या आसपास देखील नाही आहे. आपल्या तीन ब्लॉकबस्टर हिटच्या जोरावर हा अभिनेता सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला आहे.

Web Title: mahesh babu taking highest fees in south industry PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.