दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू व मराठीमोळी अभिनेत्री नम्रता शिरोडकर यांची सात वर्षांची मुलगी सितारा लवकरच सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. पण ती अभिनय करताना दिसणार नाही आहे. ती फ्रोझन २च्या तेलगू व्हर्जनमधील लहानपणीच्या एल्साला सितारा आवाज देणार आहे. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या फ्रोझनचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी सिताराच्या पदार्पणाची माहिती दिली असून फ्रोझन २ हा इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलुगू अशा चार भाषांमध्ये प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले. 


नम्रताने ही बाब इंस्टाग्रामवर सांगत लिहिलं की, या हिवाळ्यात फ्रोझन २ पाहायला खूप मज्जा येणार आहे. माझ्या छोट्या मुलीसाठी मी खूप आनंदी आहे.

यासंदर्भात सिताराची आई म्हणजेच नम्रता शिरोडकर म्हणाली की, सिताराला फ्रोझन हा चित्रपट फार आवडतो आणि त्यातील एल्सा ही भूमिका तिच्या फार जवळची आहे. तिला चित्रपटांची खूप आवड आहे. त्यामुळे एल्साला आवाज देण्याची संधी ती नाकारू शकत नव्हती. ही संधी सिताराला देण्याबद्दल मी डिस्नेच्या टीमचे आभार मानते.


अभिनेत्री श्रृती हसन ही फ्रोझन २च्या तमीळ व्हर्जनमधील एल्साला आवाज देणार आहे. तर हिंदी व्हर्जनमधील फ्रोझनमधील एल्सा पात्राला प्रियंका चोप्राने आवाज दिला आहे.

Web Title: mahesh babu daughter sitara is all set to make her debut in the showbiz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.