mahendra singh dhoni daughter ziva have a new fan in bollywood preity zinta want to kidnap her | धोनीला धमकी! काळजी घे, मी कधीही झिवाला किडनॅप करू शकते!
धोनीला धमकी! काळजी घे, मी कधीही झिवाला किडनॅप करू शकते!

ठळक मुद्देमहेन्द्र सिंग धोनीची मुलगी झिवा सोशल मीडिया स्टार आहे. तिचे क्युट फोटो आणि व्हिडीओ सर्रास व्हायरल होत असतात.

कॅप्टन कुल महेन्द्र सिंग धोनीची मुलगी झिवा हिच्या क्रिकेटच्या मैदानावरच्या बाललीला अनेकांनी पाहिल्या असतील. अनेकदा चिमुकली झिवा पापाला चीअर अप करताना दिसते. तिचा हा अंदाज पाहुन जो तो तिच्या प्रेमात पडतो. झिवाच्या प्रेमात पडलेली अशीच एक व्यक्ति म्हणजे, प्रिती झिंटा. प्रिती झिवाच्या इतकी प्रेमात आहे की, तिने चक्क तिला किडनॅप करण्याची धमकीच धोनीला दिली आहे. आश्चर्य वाटले ना, पण हे खरे आहे.
आयपीएल सामान्यादरम्यान सलग चार पराभवानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवला. या सामन्यावेळी प्रिती झिंटाने चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली. तेव्हाचा धोनीशी हस्तांदोलन करत असलेला एक फोटो प्रिती झिंटाने शेअर केला. पण या फोटोला प्रितीने दिलेले कॅप्शन पाहून प्रत्येकजण चाट पडला.
‘ धोनीचे अनेक चाहते आहेत, मी सुद्धा त्यापैकीच एक. पण आता मी चिमुकल्या झिवाची फॅन आहे. सध्या मी धोनीला एकच सांगेल, ते म्हणजे त्याने काळजी घ्यावी. कारण मी कधीही झिवाला किडनॅप करू शकते,’ असे प्रितीने या फोटोसोबत लिहिले. अर्थात हे सगळे गमती-गमतीत. सरतेशेवटी या फोटोला कॅप्शन सुचवा असे आवाहनही तिने चाहत्यांना केले.

महेन्द्र सिंग धोनीची मुलगी झिवा सोशल मीडिया स्टार आहे. तिचे क्युट फोटो आणि व्हिडीओ सर्रास व्हायरल होत असतात. अलीकडे झिवाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यात झिवाने सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले होते.


Web Title: mahendra singh dhoni daughter ziva have a new fan in bollywood preity zinta want to kidnap her
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.