ठळक मुद्देप्रेक्षक फक्त दोघांमधील हॉट सीन्स बघण्यासाठीच सिनेमागृहात हजेरी लावत असत. त्याचबरोबर माधुरीच्या धाडसाचेही कौतुक करीत असत. परंतु माधुरी मात्र या सीन्समुळे स्वत:ला खूपच अनकम्फर्ट समजायली लागली.

आजच्या काळात चित्रपटांमध्ये किसिंग सीन्स सामान्य बाब आहे. मात्र ९० च्या दशकात चित्रपटांमध्ये लिप लॉक सीन्स शूट करणे खूपच मोठी बाब समजली जात होती. जर बॉलिवूडमधील बोल्ड चित्रपटांविषयी बोलायचे झाल्यास त्यामध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांच्या ‘दयावान’ या चित्रपटाचा आवर्जून उल्लेख केला जातो. १९८८ ची ही गोष्ट आहे. जेव्हा माधुरी आणि विनोद यांच्यात अतिशय बोल्ड सीन्स शूट करण्यात आले होते. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, लोक फक्त या दोघांमधील बोल्ड सीन्स बघण्यासाठीच सिनेमागृहांमध्ये गर्दी करीत होते. मात्र काही वर्षांनंतर माधुरी मात्र या चित्रपटामुळे खूपच निराश झाली होती. हा बोल्ड सीन्स दिल्याचा तिला आजही पश्चाताप होतो. 

फिरोज खान ‘दयावान’ या चित्रपटाची निर्मिती करीत होते. विनोद आणि फिरोज यांच्यात ‘कुर्बानी’ या चित्रपटापासून खूपच चांगली मैत्री होती. त्यामुळे फिरोज यांनी विनोद यांना ‘दयावान’साठी लीड रोल ऑफर केला होता. विनोद यांनी लगेचच त्यास होकारही दिला. मात्र त्याकाळातील प्रसिद्ध अभिनेत्रींनी या चित्रपटात भूमिका साकारण्यास सपशेल नकार दिला होता. कारण यामध्ये अभिनेत्रीची भूमिका लहान आणि वेश्येची होती. 

जेव्हा सगळ्या अभिनेत्रींनी नकार दिला होता, तेव्हा फिरोज यांनी माधुरी दीक्षितशी संपर्क साधला. माधुरीनेदेखील विनोद वयाने मोठे असल्याने होकार देण्यास विलंब केला. मात्र अखेर ती ही भूमिका साकारण्यास तयार झाली. त्यामुळे फिरोज यांचा अभिनेत्रीचा शोधही संपला होता.

विनोद खन्ना आणि माधुरी दीक्षित यांच्यात एक लिप लॉक आणि एक इंटिमेट सीन्स चित्रित करायचा होता. माधुरी यास तयार होणार नाही असे या चित्रपटाच्या टीमला वाटत होते. मात्र माधुरीने आपल्यापेक्षा वयाने २० वर्षांपेक्षा मोठ्या असलेल्या विनोद यांच्याबरोबर हे सीन्स करण्यास होकार दिला. माधुरीच्या या होकाराने सगळ्यांनाच धक्का बसला होता. पुढे जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला तेव्हा चित्रपटाच्या कथा किंवा अभिनयापेक्षा विनोद खन्ना आणि माधुरी यांच्यातील या इंटीमेट सीन्सचीच अधिक चर्चा रंगली होती. 

प्रेक्षक फक्त दोघांमधील हॉट सीन्स बघण्यासाठीच सिनेमागृहात हजेरी लावत असत. त्याचबरोबर माधुरीच्या धाडसाचेही कौतुक करीत असत. परंतु माधुरी मात्र या सीन्समुळे स्वत:ला खूपच अनकम्फर्ट समजायली लागली. या चित्रपटाच्या रिलीजच्या तीन-चार वर्षांनंतर माधुरीने एका मुलाखतीत मान्य केले होते की, ‘दयावान’मध्ये तिने दिलेले इंटीमेट सीन्स खूपच निराशाजनक होते. मला आजही पश्चाताप होत आहे की, मी या भूमिकेसाठी नकार देऊ शकले नाही. मला हा चित्रपट करायला नको होता, असे तिने म्हटले होते. 


Web Title: Madhuri was reported saying that she should have said a 'no' to do the scene with vinod Khanna in Dayavan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.