माधुरी दीक्षितने सांगितली टफीविषयी ही खास गोष्ट, वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 06:00 AM2019-08-20T06:00:00+5:302019-08-20T06:00:04+5:30

हम आपके है कौनमधील टफीच्या बाबतीतली एक खास गोष्ट माधुरीने या मुलाखतीत सांगितली. 

Madhuri Dixit told about hum aapke hain kaun tuffy | माधुरी दीक्षितने सांगितली टफीविषयी ही खास गोष्ट, वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

माधुरी दीक्षितने सांगितली टफीविषयी ही खास गोष्ट, वाचून तुम्हाला बसेल आश्चर्याचा धक्का

googlenewsNext
ठळक मुद्देया चित्रपटाचे चित्रीकरण एक नव्हे तर दोन टफी करत होते. त्यातील एक टफी खूपच आळशी होता तर एक खूपच एनर्जेटिक होता. त्यामुळे आळशी टफीकडून एका ठिकाणी बसण्याचे शॉट करून घेतले जात असत तर एनर्जेटिक टफी इतका धावायचा की, त्याला पकडून आणावे लागत असे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी चित्रपटांपैकी एक असलेल्या 'हम आपके है कौन' या चित्रपटाला नुकतीच पंचवीस वर्षं पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने हिंदी चित्रपटसृष्टीसह रसिकांमध्येही या चित्रपटाच्या संबंधित आठवणी जागवल्या जात आहेत. सलमान खान, माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे, अनुपम खेर, रीमा लागू, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया बेर्डे यांनी चित्रपटात साकारलेल्या भूमिका आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. 

हम आपके है कौन या चित्रपटातील प्रेम आणि निशाची जोडी लोकांना खूप आवडली होती. त्यासोबतच दोघांची लव्हस्टोरी, चित्रपटातील गाणी आणि त्यावरील सलमान आणि माधुरीचा डान्स लोकांना विशेष आवडला. चित्रपटाला २५ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुंबईमध्ये एका ग्रँड इव्हेंटमध्ये चित्रपटाच्या स्टारकास्टसहित चित्रपटाशी निगडित सर्व लोक पोहोचले होते आणि त्यांनी हा दिवस साजरा केला होता.

हम आपके है कौन या चित्रपटाला 25 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या चित्रपटाच्या टीमने एका रेडिओ वाहिनीला नुकतीच मुलाखत दिली होती. या मुलाखतीत माधुरी दीक्षितने या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेसचे काही किस्से सांगितले. या चित्रपटातील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडल्या होत्या. या चित्रपटातील कलाकारच सोडा या चित्रपटातील टफी देखील आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या टफीच्या बाबतीतली एक खास गोष्ट माधुरीने या मुलाखतीत सांगितली. 

हम आपके है कौन या चित्रपटात आपल्याला एकच टफी दिसत असला तरी या चित्रपटात काम करणारे एक नव्हे तर दोन टफी होते आणि हे टफी आमच्यापेक्षा मोठे स्टार होते असा खुलासा माधरीने केला आहे. माधुरी सांगते, या चित्रपटाचे चित्रीकरण एक नव्हे तर दोन टफी करत होते. त्यातील एक टफी खूपच आळशी होता तर एक खूपच एनर्जेटिक होता. त्यामुळे आळशी टफीकडून एका ठिकाणी बसण्याचे शॉट करून घेतले जात असत तर एनर्जेटिक टफी इतका धावायचा की, त्याला पकडून आणावे लागत असे. टफी आमच्या सगळ्यांपेक्षा कित्येक पटीने मोठा स्टार होता. 

Web Title: Madhuri Dixit told about hum aapke hain kaun tuffy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.