व्हायरल बातमी ऐकून हैराण झाली माधुरी दीक्षित; म्हणाली, हे माझ्यासाठीही मोठे सरप्राईज!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 05:51 PM2020-06-11T17:51:51+5:302020-06-11T17:53:10+5:30

माधुरी दीक्षित व संजय दत्त यांचा ‘खलनायक’ हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. सध्या या चित्रपटासंदर्भातील एक बातमी वा-याच्या वेगाने व्हायरल होतेय.

madhuri dixit shocked on khalnayak 2 this is how actress react | व्हायरल बातमी ऐकून हैराण झाली माधुरी दीक्षित; म्हणाली, हे माझ्यासाठीही मोठे सरप्राईज!!

व्हायरल बातमी ऐकून हैराण झाली माधुरी दीक्षित; म्हणाली, हे माझ्यासाठीही मोठे सरप्राईज!!

googlenewsNext
ठळक मुद्देचर्चा खरी मानाल तर ‘खलनायक’च्या सीक्वलमध्ये टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसू शकतो. 

माधुरी दीक्षित व संजय दत्त यांचा ‘खलनायक’ हा सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. सध्या या चित्रपटासंदर्भातील एक बातमी वा-याच्या वेगाने व्हायरल होतेय. खरे तर ही बातमी ऐकून खुद्द माधुरीही शॉक्ड झालीये. मला याबद्दल काहीही माहिती नाही, असे तिने म्हटलेय.
‘खलनायक’ या सिनेमात माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ व संजय दत्त मुख्य भूमिकेत होते. हा सिनेमा सुपरडुपर हिट ठरला होता. चित्रपटात संजयने खलनायकाची भूमिका साकारली होती. ‘खलनायक’ सुपरहिट होण्यामागे यातील एका गाण्याचा मोठा वाटा होता. होय, चोली के पिछे क्या है, या गाण्यामुळे हा सिनेमाला तुफान लोकप्रियता मिळवली होती. तर आता याच चित्रपटाच्या सीक्वलची चर्चा सुरु झाली आहे. होय, ‘खलनायक’चा सीक्वल अर्थात ‘खलनायक 2’ येणार अशी सध्या जोरदार चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वी सुभाष घई यांनी याबद्दल माहिती दिली होती. मी ‘खलनायक’च्या सीक्वलवर काम करतोय आणि स्क्रिप्ट जवळजवळ तयार असल्याचे त्यांनी सांगितले होते. माधुरीला जेव्हा ‘खलनायक’च्या सीक्वलबद्दल विचारले गेले तेव्हा ती हैराण झाली़.

मला ‘खलनायक’च्या सीक्वलबद्दल काहीही माहिती नाही. मलाही हे पहिल्यांदा कळतेय. माझ्यासाठी तर हे एक सरप्राइज आहे. हा चित्रपट बनलाच तर त्यात कोणाची वर्णी लागेल, चित्रपट कुठे शूट होईल, हे लवकरच कळेल, असे ती म्हणाली. तू या चित्रपटात दिसणार का? असे विचारले असता हे स्क्रिप्टवर अवलंबून असल्याचे तिने सांगितले. स्क्रिप्ट कशी आहे, काय आहे, यावर माझी भूमिका त्यात आहे की नाही ते ठरेल. पण तूर्तास मला याबद्दल काहीही माहिती नाही, असे तिने सांगितले.

चर्चा खरी मानाल तर ‘खलनायक’च्या सीक्वलमध्ये टायगर श्रॉफ मुख्य भूमिकेत दिसू शकतो. खुद्द संजय दत्तने त्याच्या नावाला पसंती दिली आहे. नव्या जनरेशनमध्ये खलनायक 2मध्ये कोणी असू शकेल तर तो टायगर श्रॉफ आहे, असे संजूबाबा म्हणाला होता.

Web Title: madhuri dixit shocked on khalnayak 2 this is how actress react

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.