ठळक मुद्देहिरो या चित्रपटातून नावारूपास आलेल्या मीनाक्षीला नो मेकअप लूकमध्ये बघाल तर तुम्हीही थक्क व्हाल.

90 च्या दशकातील या अभिनेत्रींचे आजही अनेक चाहते आहेत. केवळ आपल्या सौंदर्याने नाही तर आपल्या अदाकारीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणा-या अशाच काही अभिनेत्रींची नावे घ्यायची झाल्यास माधुरी दीक्षित, रवीना टंडन, मीनाक्षी शेषाद्री, जुही चावला, तब्बू यांची नावे घेता येतील. या अभिनेत्रींचा मेकअप लूक तुम्ही अनेकदा बघता. पण आज आम्ही 90 च्या दशकातील या पाच अभिनेत्रींच्या नो मेकअप लूकचे फोटो घेऊ आलो आहोत.

माधुरी दीक्षित आजही इंडस्ट्रीत सक्रीय आहे. सध्या ती एक टीव्ही शो जज करतेय. अलीकडे तिचा ‘कलंक’ हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. आपल्या हास्याने चाहत्यांना मोहिनी घालणा-या माधुरीचा हा नो-मेकअप लूक...

बॉलिवूडची मस्त-मस्त गर्ल रवीना टंडन 90 च्या दशकातील दिग्गज अभिनेत्रींपैकी एक. रवीनाने कधीच वयाची चाळीशी पूर्ण केली आहे. अर्थात आजही ती तितकीच फिट आहे. ख-या आयुष्यात रवीना अशी दिसते.

जुही चावला 51 वर्षांची आहे. जुही सुद्धा आजही बॉलिवूडमध्ये सक्रीय आहे. विना मेकअप ती अशी दिसते.

मीनाक्षी शेषाद्रि 90 च्या दशकातील सुपरहिट हिरोईन. आपल्या सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये तिने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आणि एकदिवस अचानक बॉलिवूडला रामराम ठोकला. हिरो या चित्रपटातून नावारूपास आलेल्या मीनाक्षीला नो मेकअप लूकमध्ये बघाल तर तुम्हीही थक्क व्हाल.

अभिनेत्री तब्बू 47 वर्षांची आहे. अद्यापही अविवाहित असलेली तब्बू पडद्यावर कमालीची सुंदर दिसते. पण रिअल लाईफमध्ये ती काहीशी अशी दिसते.
 


Web Title: madhuri dixit to meenakshi sheshadri 90s actress without makeup picture
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.