ठळक मुद्देसंजू आणि माधुरी यांनी साजन या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर त्यांच्या अफेरच्या बातम्या यायला लागल्या. १९९३ ला झालेल्या बॉम्ब ब्लास्टमध्ये संजय दत्तचे नाव आले आणि तेव्हापासून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला.

संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असून ते लग्न करणार असल्याच्या बातम्या देखील नव्वदीच्या दशकात ऐकायला मिळाल्या होत्या. १९९३ ला झालेल्या बॉम्ब ब्लास्टमध्ये संजय दत्तचे नाव आले आणि तेव्हापासून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. आज संजय आणि माधुरी हे आपापल्या आयुष्यात खूश असून संजयचे मान्यतासोबत तर माधुरीचे डॉ. श्रीराम नेनेसोबत लग्न झाले आहे. त्या दोघांनी अनेक वर्षांनंतर नुकतेच कलंक या चित्रपटातदेखील एकत्र काम केले.

संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांची प्रेमकथा कधी सुरू झाली याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. संजू आणि माधुरी यांनी साजन या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटानंतर त्यांच्या अफेरच्या बातम्या यायला लागल्या. याच चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान ते दोघे प्रेमात पडले असे म्हटले जाते.  

संजय आणि माधुरीच्या नात्याविषयी लेखक यासिर उसमान यांनी संजय दत्तः द क्रेझी अनटोल्ड स्टोरी ऑफ बॉलिवूड्स बॅड बॉय या पुस्तकात लिहिले होते. त्यांनी नमूद केले होते की, संजय दत्तची पहिली पत्नी रिचा कॅन्सरच्या उपचारासाठी न्यूयॉर्कला असताना तिला माधुरी आणि संजच्या अफेअरविषयी कळले. त्यावेळी तिच्या तब्येतीत पहिल्यापेक्षा खूप सुधारणा झाली होती. मीडियातील बातम्या वाचून तिला काहीही करून भारतात परतायचे होते आणि आपला संसार वाचवायचा होता. 

रिचा काहीच महिन्यांनंतर त्यांची मुलगी त्रिशालासोबत भारतात परतली. तिचा आजार बरा झाला होता. पण संजय तिला टाळू लागला होता. सिनेब्लिझ्टला दिलेल्या मुलाखतीत तर रिचाच्या बहिणीने सांगितले होते की, रिचा आणि त्रिशालाला विमानतळावर घ्यायला देखील संजय त्यावेळी गेला नव्हता. रिचा परतली तोपर्यंत संजय पूर्णपणे बदलला होता. त्यामुळे १५ दिवसांतच ती पुन्हा न्यूयॉर्कला परतली आणि रिचाने संजयला घटस्फोट देण्याचे ठरवले. पण त्याच काळात तिचा कॅन्सर उलटला आणि तिची तब्येत ढासळत गेली. 


Web Title: Madhuri Dixit Birthday Special: Sanjay Dutt And Madhuri Dixit Love Story
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.