Is madhur bhandarkar making a film on taimur ali khan | तैमूरवर सिनेमा येणार ? मधुर भंडारकर यांनी दिले हे उत्तर
तैमूरवर सिनेमा येणार ? मधुर भंडारकर यांनी दिले हे उत्तर

ठळक मुद्देतैमुरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतातमधुर यांनी आपल्या आगामी सिनेमासाठी तैमूरचे नाव रजिस्टर केल्याची चर्चा होती

काही महिन्यांपूर्वी मधुर भंडारकर तैमूर अली खानववर सिनेमा तयार करणार असल्याची चर्चा होती. मात्र मधुरा भंडारकर या चर्चा फेटाळल्या आहेत. त्यांनी सांगितले ते तैमूरवर सिनेमा तयार करत नाहीत. सैफ अली खान आणि करिना कपूरचा छोटा नवाब तैमूर स्टारकिड्सच्या रेसमध्ये सर्वात आघाडीवर आहे. तैमूरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होताना दिसतात. 
मधुर यांनी आपल्या आगामी सिनेमासाठी तैमूरचे नाव रजिस्टर केल्याची चर्चा होती. 

त्यामुळे येत्या दिवसांत आपल्या  करिना व सैफच्या लाडक्या मुलाच्या नावाचा चित्रपट पाहायला मिळणार अशी आशा सगळ्यांना होती. नुकताच एका इव्हेंट दरम्यान मधुर यांनी खुलासा केला की, माझ्या प्रोडेक्शन हाऊस अंतर्गत अनेक नावांचे टायटल रजिस्टर करण्यात येत आहेत. 


सैफ अली खान व करिना कपूर खानचा मुलगा तैमुर अली खान खाचे स्टारडम कुठल्याही बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. दरदिवशी तैमुरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात. तो दिसला रे दिसला की, मीडियाचे कॅमेरे त्याची एक छबी टीपण्यासाठी पुढे सरसावतात. गतवर्षी बाजारात आलेला तैमूर बाहुला तुम्हाला आठवत असेलच. केरळच्या एका मार्केटमध्ये तैमूरच्या चेहºयाचा बाहुला लोकप्रिय झाला होता.


Web Title: Is madhur bhandarkar making a film on taimur ali khan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.