ड्रग्स कनेक्शनमध्ये अडकलेल्या मधु मंटेनाचे अभिनेत्री नीना गुप्तासह आहे खास कनेक्शन, वाचा सविस्तर

By सुवर्णा जैन | Published: September 23, 2020 01:18 PM2020-09-23T13:18:00+5:302020-09-23T13:29:36+5:30

मधू मँटेना फॅंटम फिल्म्सचा सह-संस्थापक आहे, याच्या माध्यमातून 'लुटेरा', 'हंसी तोह फँसी', 'बॉम्बे वेल्वेट', 'नेक्स्ट' आणि 'क्वीन टू बॉलीवूड' यासारखे सुपरहिट सिनेमे दिले आहेत.

Madhu Mantena, who has appeared in Drugs Connection, has a special connection with actress Nina Gupta, read more | ड्रग्स कनेक्शनमध्ये अडकलेल्या मधु मंटेनाचे अभिनेत्री नीना गुप्तासह आहे खास कनेक्शन, वाचा सविस्तर

ड्रग्स कनेक्शनमध्ये अडकलेल्या मधु मंटेनाचे अभिनेत्री नीना गुप्तासह आहे खास कनेक्शन, वाचा सविस्तर

googlenewsNext

बॉलिवूड निर्माता मधु मंटेना वर्माला सुद्धा एनसीबीने आज चौकशीसाठी बोलवलं आहे. मधुचे बॉलीवूडला ड्रग्ज पुरवणाऱ्यांशी जवळचे संबंध असल्याची माहिती मिळाल्याने त्याला समन्स बजावले आहे. एनसीबी जया साहा आणि मधु मंटेना यांना एकत्र बसवून चौकशी करणार आहे. मधु मंटेनाची ड्रग्स संदर्भाती चॅट मेसेज समोर आल्यानंतर मधु मंटेनाही चर्चेत आला आहे.  मधु मंटेनाने जया साहा सह केले चॅट रेकॉर्डमधून धक्दादायक खुलासे समोर आले आहे. यात वीड नावाचे ड्रगची मागणी करताना  तो दिसत आहे. मधुच्या मेसेला जयानेही  रिप्लाय देताना म्हटले आहे की, ठिक आहे पाठवून देते. मधु मंटेनाचा जयाची क्वान कंपनीसह संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. 

 

कोण आहे मधु मंटेना?

मधु मंटेना हा सिनेनिर्माता आहे.  त्याने  हिंदी, तेलुगू आणि बांग्ला सिनेमांची निर्मिती केली आहे. तसेच सिनेमांच्या डिस्ट्रिब्यूशनचेही काम  तोच सांभाळतो. 2008 मध्ये मधु मंटेनाने आमिरा खानचा 'गजनी' सिनेमाचेही निर्मितीचे काम केले होते. 'रक्त चरित्र' आणि 'ऑटोग्राफ' सारख्या सिनेमांचेही  प्रोडक्शनचे काम त्याने केले होते.

 

मधू मँटेना फॅंटम फिल्म्सचा सह-संस्थापक आहे, याच्या माध्यमातून 'लुटेरा', 'हंसी तोह फँसी', 'बॉम्बे वेल्वेट', 'नेक्स्ट' आणि 'क्वीन टू बॉलीवूड' यासारखे सुपरहिट सिनेमे दिले आहेत. , 'उडता पंजाब', 'रमण राघव 2.0',' सुपर 30', 'ट्रॅप्ड,' 'हायजॅक', 'मनमर्जिया', 'ब्रिलियंट' आणि 'हंटर' या सिनेमांचे देखील मधु मंटेनाच निर्माता होता.

लग्नाच्या तीन वर्षातच मधु मंटेनाचा मसाबासह झाला घटस्फोट !

मधुने अभिनेत्री नीना गुप्ता यांची मुलगी आणि लोकप्रिय फॅशन डिझायनर मसाबा गुप्ताशी लग्न केले होते. २०१५ मध्ये दोघेही लग्नबंधनात अडकले होते. मात्र या दोघांचेही लग्न फार काळ काही टिकले नाही.दरम्यान ‘ट्रायल सेपरेशन’च्या या निर्णयानंतर सात महिन्यांनी मसाबाने न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता.

 

मसाबाचा हा निर्णय सर्वांसाठीच शॉकिंग होता.अखेर नात्याला पूर्णविराम देत  दोघे 2019 मध्ये घटस्फोट घेत वेगळे झाले. मसाबापासून घटस्फोट घेण्यापूर्वी मधु अभिनेत्री नंदना सेनबरोबर रिलेशनशिपमध्ये होता. 


नीना गुप्तांसाठी होता मोठा धक्का !

मधुपासून विभक्त होण्याचा लेक मसाबाचा निर्णय नीना गुप्तांसाठी धक्कादायक होता. एका मुलाखतीत त्या याबद्दल बोलल्या होत्या. ‘एक आई या नात्याने मी मसाबाला समजवण्याचा बराच प्रयत्न केला होता. घाई करू नकोस, विचारपूर्वक निर्णय घे, असे मी तिला सांगितले होते.

कारण आम्हाला मधु आवडतो. तो एक चांगला माणूस आहे. पण काहीही तोडगा निघाला नाही. तिने घटस्फोटाचा निर्णय अतिशय विचारपूर्वक घेतला. पण तरीही तिचा निर्णय माझ्यासाठी धक्कादायक होता,’ असे नीना यांनी सांगितले होते.

Web Title: Madhu Mantena, who has appeared in Drugs Connection, has a special connection with actress Nina Gupta, read more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.