अभिमानास्पद ! बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या मुलाने एशियन गेम्समध्ये पटकावलं सिल्वर मेडल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 06:00 AM2019-09-27T06:00:00+5:302019-09-27T06:00:00+5:30

वेदांतने एशियन एज ग्रुप चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर मेडल पटकावले आहे.

Madhavan son wins silver medal freestyle relay india asian age group championship | अभिमानास्पद ! बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या मुलाने एशियन गेम्समध्ये पटकावलं सिल्वर मेडल

अभिमानास्पद ! बॉलिवूडच्या या अभिनेत्याच्या मुलाने एशियन गेम्समध्ये पटकावलं सिल्वर मेडल

googlenewsNext

अभिनेता आर माधवनचा मुलगा वेदांतने एशियन एज ग्रुप चॅम्पियनशिपमध्ये सिल्वर मेडल पटकावले आहे. वेदांतच्या ग्रुपमध्ये तीन आणखी मुलांचा देखील समावेश आहे. त्यांच्या ग्रुपने फ्रिस्टाईल रिले(स्विमिंग)मध्ये सहभाग घेतला होता.  


माधवने मुलाचा आणि त्याच्या ग्रुपचा फोटो मेडलसकट इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्या फोटोमध्ये वेदांतसह तीन मुलं मेडल घालून उभे आहेत. ''एशियन गेम्समध्ये भारतला सिल्वर मेडल मिळाले. देवाचे आशीर्वाद...भारताला रिप्रेजेंट करताना वेदांतचे पहिले अधिकृत मेडल.''  
वेदांत आणि माधवन यांच्यावर सेलेब्स आणि फॅन्सकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. वेदांतचे वय 14 वर्षांचं आहे. गेल्या वर्षी वेदांतने थायलँडच्या इंटरनॅशनल स्विमिंग मीटमध्ये ब्रॉन्ज मेडल जिंकले होते. 

 
माधनवच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर तो,  'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट'च्या पोस्ट प्रॉडक्शनमध्ये बिझी आहे. माधवन यात शास्त्रज्ञ एस. नंबी नारायणन यांची भूमिका साकारणार असल्याचे समजतंय. नंबी नारायणन हे इस्रोमधील एक शास्त्रज्ञ असून त्यांना १९९४मध्ये हेरगिरी प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती.

नंबी नारायणन यांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रमाबाबतचा गोपनीय दस्तऐवज परकीयांच्या स्वाधीन केल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' चित्रपट तमीळ, तेलगू, हिंदी व इंग्रजी भाषेत प्रदर्शित होणार आहे. नंबी यांचा प्रवास रुपेरी पडद्यावर पाहणे व या भूमिकेत आर. माधवनला पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Web Title: Madhavan son wins silver medal freestyle relay india asian age group championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.