करण जोहरवर भडकला मधुर भांडारकर, 'या' गंभीर आरोपाने उडवून दिली खळबळ...

By अमित इंगोले | Published: November 21, 2020 08:51 AM2020-11-21T08:51:49+5:302020-11-21T08:54:39+5:30

करणवर हा आरोप दुसरं-तिसरं कुणी नाही तर चक्क दिग्दर्शक मधुर भांडारकरने लावला आहे. मधुर भांडारकरने करणवर हा आरोप लावून खळबळ उडवून दिली आहे.

Madhaur Bhandarker serious allegation on Karan fabulous lives of bollywood wives | करण जोहरवर भडकला मधुर भांडारकर, 'या' गंभीर आरोपाने उडवून दिली खळबळ...

करण जोहरवर भडकला मधुर भांडारकर, 'या' गंभीर आरोपाने उडवून दिली खळबळ...

Next

बॉलिवूड दिग्दर्शक निर्माता करण जोहर याचा वादात सापडण्याचा सिलसिला अजूनही सुरूच आहे. नेपोटिज्म वादातून तो नुकताच मागे पडला होता. तसेच त्याच्यावर पार्टीत ड्रग्स घेण्याचाही आरोप होता. पण तोही नंतर खोटा असल्याचं स्पष्ट झालं. आता करणवर सिनेमाचं टायटल चोरी केल्याचा गंभीर आरोप लावण्यात आला आहे.

करणवर हा आरोप दुसरं-तिसरं कुणी नाही तर चक्क दिग्दर्शक मधुर भांडारकरने लावला आहे. मधुर भांडारकरने करणवर हा आरोप लावून खळबळ उडवून दिली आहे. मधुर भांडारकरने एका ट्विटच्या माध्यमातून करण जोहरवर त्याच्या आगामी सिनेमाचं टायटल चोरी केल्याचा आरोप लावला आहे.

करण जोहरची वेबसीरीज Fabulous Lives of Bollywood Wives रिलीज होणार आहे. या सीरीजचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला आहे. पण मधुर म्हणाला की, बॉलिवूड वाइफ्स हे त्याच्या आगामी सिनेमाचं टायटल आहे. अशात मधुरला वाटत आहे की, जर करणची ही वेबसीरीज रिलीज झाली तर त्याच्या आगामी प्रोजेक्टचं मोठं नुकसान होऊ शकतं. यामुळेच त्याने सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली आहे.

ट्विटमध्ये मधुर भांडारकरने लिहिले की, 'करण जोहर आणि अपूर्वा मेहताने मला विचारले होते की, ते त्यांच्या सीरीजचं नाव बॉलिवूड वाइफ्स ठेवू शकतात का? मी त्यावेळी त्यांना नकार दिला होता. कारण माझा एक प्रोजेक्ट याच नावाने रिलीज होणार होता.

मधुरने पुढे लिहिले की, आपल्या सीरीजचं टायटल Fabulous Lives of Bollywood Wives ठेवून त्यांनी चुकीचं काम केलं आहे. माझी विनंती आहे की, माझ्या प्रोजेक्टचं नुकसान करू नका. आपल्या सीरीजचं नाव बदला. मधुर भांडारकरचं हे ट्विट आता व्हायरल झालं आहे. करण जोहर सारख्या मोठ्या निर्मात्यावर अशाप्रकारे गंभीर आरोप लावल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. अजून यावर करणने आपली प्रतिक्रिया दिली नाही.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर करण जोहरच्या आयुष्यात अनेक चढउतार बघायला मिळाले. कधी त्याच्यावर नेपोटिज्म वाढवण्याचा आरोप झाला तर कधी तो ड्रग्स वादात सापडला. आता तर मधुर भांडारकरने करण जोहरवर हा गंभीर आरोप लावला आहे.
 

Web Title: Madhaur Bhandarker serious allegation on Karan fabulous lives of bollywood wives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app