बॉलिवूडचा हॅण्डसम हंक कार्तिक आर्यन व अभिनेत्री कृति सेनॉनचा 'लुका छुपी' चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. इतकेच नाही तर या चित्रपटातील कृति व कार्तिकची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली. आता या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ५० दिवस पूर्ण करत देशभरात जवळपास ९५ कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात बॉक्स ऑफिसवर ११५ कोटींचा बिझनेस केला आहे. लुका छुपीच्या यशामुळे कार्तिक खूपच खूश आहे. 

कार्तिक आर्यनचा हा पहिला चित्रपट नाही ज्याने चित्रपटगृहात पन्नास दिवस पूर्ण केले. हा त्याचा चौथा सिनेमा आहे. 'लुका छुपी'च्या आधी 'प्यार का पंचनामा', 'प्यार का पंचनामा २', 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटांनीदेखील चित्रपटगृहात पन्नास दिवस पूर्ण केले होते. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते.

याबाबत कार्तिक म्हणाला की, 'माझा चौथा चित्रपटदेखील पन्नास दिवस थिएटरमध्ये चालला, माझ्यासाठी ही खूप मोठी बाब आहे. लुका छुपी एक कौटुंबिक चित्रपट आहे आणि त्यातील पात्रांना प्रेक्षकांचे एवढे प्रेम मिळत आहे, त्यामुळे मी खूप खूश आहे. हा चित्रपट फक्त तरूणांनाच नाही तर संपूर्ण कुटुंबाला चित्रपटगृहात घेऊन आला. मला चित्रपटाच्या स्क्रीप्टवर खूप विश्वास होता आणि लोकांना हा चित्रपट आवडेल, अशी आशा होती. मला आनंद आहे की सोनू सारखाच गुड्डूनेदेखील रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. ' 

सध्या कार्तिक दोन चित्रपटांच्या शूटिंगमध्ये बिझी आहे.

इम्तियाज अली दिग्दर्शित 'लव आज कल २' आणि दुसरा चित्रपट 'पति पत्नी और वो'च्या रिमेकमध्ये कार्तिक मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दोन्ही चित्रपट रोमँटिक कॉमेडी आहेत.


Web Title: Luka Chuppi becomes Kartik Aaryan's fourth film to Complete 50 Days!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.