ठळक मुद्देप्रियंकाने सांगितले होते की, हे जॅकेट मी विमानात वापरत असून हे माझ्या पूर्वप्रियकराचे आहे. शाहरुख खानचे काही जुने फोटो सापडले असून अनेक वर्षांपूर्वी लंडनवरून परताना विमानतळावर त्याने असेच अगदी सेम टू सेम जॅकेट घातले होते. 

प्रियंका चोप्राचेनिक जोनास सोबत काहीच महिन्यांपूर्वी लग्न झाले असून अनेक सार्वजनिक कार्यक्रमात त्या दोघांना आपल्याला एकत्र पाहायला मिळते. सोशल मीडियावर देखील ते दोघे त्यांचे फोटो पोस्ट करत असतात. निकसोबत लग्न करण्याआधी प्रियंकाच्या अनेक अफेअरची मीडियात चांगलीच चर्चा रंगली होती.

प्रियंकाने डॉन या चित्रपटात खूप चांगली भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या वेळेस शाहरुख खान आणि प्रियंका चोप्रा एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याचे म्हटले जात होते. पण या दोघांनीही यावर मौन राखणेच पसंत केले होते. पण तुम्हाला माहीत आहे का, एका कार्यक्रमात चक्क प्रियंकाने तिच्या आणि शाहरुखच्या अफेअरची अप्रत्यक्षपणे कबुली दिली होती. डर्टी लाँड्री या कार्यक्रमात प्रियंका काही महिन्यांपूर्वी झळकली होती. या कार्यक्रमात सेलिब्रेटी अनेक वर्षांपासून त्यांनी जतन केलेल्या कपड्यांविषयी आणि दागिन्यांविषयी भरभरून गप्पा मारतात. ते आपले आवडते कपडे, वस्तू या कार्यक्रमात घेऊन देखील येतात. या कार्यक्रमात प्रियंकाने कोणती वस्तू आणली होती तुम्हाला माहीत आहे का?

प्रियंका या कार्यक्रमात एक जॅकेट, काही चप्पल आणि बॅग घेऊन गेली होती. पण या सगळ्यात तिने आणलेल्या लेदर जॅकेटने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. कारण या जॅकेटच्या संबंधित एक खूप रंजक किस्सा तिने सांगितला होता. डर्टी लाँड्री या कार्यक्रमात येताना ही गोष्ट घेऊन येऊ की नको... असा मला प्रश्न पडला होता. पण त्यानंतर मी विचार केला की, मी हे घेऊन जाते... माझ्याकडे असलेले हे जॅकेट मी विमानतळावर अथवा विमानात वापरते. हे माझ्या पूर्वप्रियकराचे आहे.

हे जॅकेट प्रियंकाच्या पूर्वप्रियकराचे आहे हे कळल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. हे जॅकेट तिच्या पूर्वप्रियकराचे म्हणजे कोणाचे आहे असा सगळ्यांना प्रश्न पडला होता. बॉलिवूडशादी या वेबसाईटच्या वृत्तानुसार, हे जॅकेट शाहरुख खानचे असू शकते. त्यांना शाहरुख खानचे काही जुने फोटो सापडले असून अनेक वर्षांपूर्वी लंडनवरून परताना विमानतळावर त्याने असेच अगदी सेम टू सेम जॅकेट घातले होते. 


Web Title: In Love With Nick Now, Priyanka Chopra Was Once Dating Shah Rukh Khan, Confirmed Her Affair On TV
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.