Love Aaj Kal Movie Box Office Collection Day 1: व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कार्तिक-साराला मिळाले भरभरून प्रेम, पहिल्याच दिवशी केली बंपर कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 12:26 PM2020-02-15T12:26:17+5:302020-02-15T12:28:31+5:30

Love Aaj Kal Movie Box Office Collection Day 1 : कार्तिक आर्यन व सारा अली खानचा 'लव्ह आज कल २' व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रदर्शित झाला आहे.

Love Aaj Kal Box Office Collection Day 1: Loved Kartik-Sara on Valentine's Day, Bumper Earnings on First Day | Love Aaj Kal Movie Box Office Collection Day 1: व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कार्तिक-साराला मिळाले भरभरून प्रेम, पहिल्याच दिवशी केली बंपर कमाई

Love Aaj Kal Movie Box Office Collection Day 1: व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कार्तिक-साराला मिळाले भरभरून प्रेम, पहिल्याच दिवशी केली बंपर कमाई

googlenewsNext

कार्तिक आर्यनसारा अली खानचा 'लव्ह आज कल २' व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन इम्तियाज अलीने केले आहे.  या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार सुरूवात केली आहे. पहिल्याच दिवशी भारतात बॉक्स ऑफिसवर लव्ह आज कलने १२.४ कोटींची कमाई केली आहे.


व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या इम्तियाज अलीच्या लव्ह आज कल चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत असल्याचे पहायला मिळत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी १२.४ कोटींची कमाई केली आहे. 


लव्ह आज कलने पहिल्याच दिवशी बारा कोटींचा आकडा पार करत कार्तिक आर्यन बॉलिवूडमधील पहिल्याच दिवशी सर्वाधिक गल्ला जमविणारा तरूण अभिनेता ठरला आहे.  कार्तिक आर्यनने एकानंतर एक दमदार चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे.


२००९ साली प्रदर्शित झालेला चित्रपट लव्ह आज कलचे दिग्दर्शनही इम्तियाज अलीने केले होते. या चित्रपटात सैफ अली खान व दीपिका पादुकोण मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटातही वेगवेगळ्या काळातील प्रेम कथा दाखवली होती. 


तसेच आता प्रदर्शित झालेला चित्रपट लव्ह आज कलमध्येदेखील प्रेक्षकांसमोर दोन प्रेमकथा सादर केल्या आहेत. त्यातील एक कथा १९९० सालची आहे आणि दुसरी आताच्या काळातील म्हणजेच २०२०मधली.


लव्ह आज कल चित्रपटातून पहिल्यांदाच कार्तिक आर्यन व सारा अली खान रुपेरी पडद्यावर झळकली आहे. या फ्रेश जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावते आहे.

Web Title: Love Aaj Kal Box Office Collection Day 1: Loved Kartik-Sara on Valentine's Day, Bumper Earnings on First Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.