Lockdown: anupam kher chat with johny lever in video call and shared video-ram | Lockdown : आप भी सुनिये आत्मा प्रसन्न हो जाएगी...! अनुपम खेर सोशल मीडियावर ‘फुल ऑन’ अ‍ॅक्टिव्ह

Lockdown : आप भी सुनिये आत्मा प्रसन्न हो जाएगी...! अनुपम खेर सोशल मीडियावर ‘फुल ऑन’ अ‍ॅक्टिव्ह

लॉकडाऊनच्या काळात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी वेगवेगळ्या कामात बिझी आहेत. पण अनुपम खेर मात्र सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत. लॉकडाऊनच्या काळात अनुपम एकापाठोपाठ एक अनेक व्हिडीओ शेअर करत आहेत. आता तर अनुपम यांनी एक नवा उपक्रम हाती घेतला आहे. होय, जे लोक आनंद देतात, त्यांना फोन करून त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारण्याचा धडाका त्यांनी लावला आहे. 
आज अनुपम यांनी एक व्हिडीओ शेअर केला. यात अनुपम सुप्रसिद्ध कॉमेडियन जॉनी लिव्हर यांच्याशी व्हिडीओ कॉलवरून बोलताहेत. ‘मेरी सीरिज... उन लोगों को फोन करो जो आपको खुश करते है...अत्यंत आशावादी असा माझा मित्र जॉनी लिव्हरला फोन केला. त्याच्यासोबत बोलून मन प्रसन्न झाले...’, असे हा चॅट व्हिडीओ शेअर करताना अनुपम यांनी लिहिले आहे.

व्हिडीओ चॅटमधून दिला बोध...
अनेक लोकांची स्थिती आज चांगली नाही़ त्या लोकांनी स्वत:ला कसे सांभाळता येईल, तुला काय वाटते? असा प्रश्न अनुपम जॉनी यांना करतात. यावर जॉनी काय बोध देतात, ते ऐकण्यासारखे आहे. होय, काही लोक स्वत:च स्वत:चे वाईट करून घेतात. खरेपणा सोडून वेगळ्या मार्गाने भरकटतात. सूर भरकटतो, कामही बिघडते. थोडे स्वत:त झाकून बघितले ना तर प्रत्येक जण आपोआप आनंदी होईल, असे जॉनी म्हणतात.

कैसे है...?


काल अनुपम यांनी असाच एक व्हिडीओ शेअर केला होता. आजकाल आयुष्यात कुठल्याही गोष्टीचे महत्त्वच राहिलेले नाही, याकडे तुम्ही लक्ष दिले? या प्रश्नाने अनुपम या व्हिडीओची सुरुवात करतात. आपण स्वत:ला परमेश्वर मानू लागलो होतो. आता सगळेच जमिनीवर आलेत. सगळे घरात भीतीने दडून बसलेत. या कसोटीच्या क्षणानंतर पुन्हा स्वत:ला परमेश्वर मानण्याची चूक करू नका. जवळच्या लोकांची कदर करा, आनंदी राहा, असे अनुपम यात म्हणताहेत.

Web Title: Lockdown: anupam kher chat with johny lever in video call and shared video-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.