बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर व अभिनेत्री कियारा आडवाणी यांचा आगामी चित्रपट 'कबीर सिंग'चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या ट्रेलरला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटातील शाहिद व कियारा या जोडीला लोकांची खूप पसंती मिळते आहे. ट्रेलर पाहिल्यावर त्यात तुम्हाला कियारा व शाहिद यांचा किसिंग सीनदेखील पहायला मिळाला. हा सीनची सगळीकडे खूप चर्चा होते आहे.

इतकेच नाही तर जेव्हा शाहिद व कियारा यांना ट्रेलर लाँचवेळी एका रिपोर्टरने किसिंग सीनबद्दल विचारले. तेव्हा शाहिदने मस्करीत उत्तर दिले. त्यानंतर याबद्दल कियाराला विचारले की चित्रपटात जवळपास किती किसिंग सीन असणार आहेत?

त्यावर कियारा म्हणाली की, मी मोजले नाहीत. त्यासाठी तुम्हाला २१ जूनला चित्रपट पहावा लागेल. तिचे वाक्य पूर्ण करीत शाहिद म्हणाला की, त्याचेच हे पैसे आहेत.
कबीर सिंग चित्रपटात शाहिद कपूर दोन अंदाजात दिसणार आहे. एका रुपात तो एका मुलीवर नितांत प्रेम करताना दिसणार आहे. तर दुसऱ्या रुपात रागीट, सनकी, जिद्दी आणि नशेत बुडालेला दिसतो. 

'कबीर सिंग' चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाची कथा दारूच्या नशेत बुडालेल्या सर्जनची आहे. जो प्रेमात अपयशी ठरल्यानंतर स्वतःला बर्बाद करायचे ठरवतो. हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपट अर्जुन रेड्डीचा रिमेक आहे.

या चित्रपटाशिवाय कियारा गुड न्यूज चित्रपटात दिसणार आहे.या चित्रपटात तिच्यासोबत करीना कपूर, अक्षय कुमार व दलजीत दोसांझ मुख्य भूमिकेत आहेत. तसेच तिची कंचना या चित्रपटात देखील वर्णी लागली आहे.
 


Web Title: Listen to the novel ...! Kiara says, Kissing Scene with Shahid is not counted
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.