प्रभासच्या ‘साहो’वर या बॉलिवूड अभिनेत्रीने केले गंभीर आरोप, वाचा काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2019 11:47 AM2019-09-01T11:47:39+5:302019-09-01T11:48:45+5:30

साउथ सुपरस्टार प्रभासचा बहुचर्चित सिनेमा ‘साहो’ नुकताच प्रदर्शित झाला. प्रभासच्या या चित्रपटाची चाहत्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. अखेर तो रिलीज झाला. पण रिलीज होताच एका वादात सापडला.

lisa ray accuses saaho makers of plagiarism actress shared photos on instagram |  प्रभासच्या ‘साहो’वर या बॉलिवूड अभिनेत्रीने केले गंभीर आरोप, वाचा काय आहे प्रकरण

 प्रभासच्या ‘साहो’वर या बॉलिवूड अभिनेत्रीने केले गंभीर आरोप, वाचा काय आहे प्रकरण

googlenewsNext
ठळक मुद्दे‘साहो’ हा सिनेमा सुजीत यांनी दिग्दर्शित केलेला आहे. चार भाषांत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात प्रभास आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत.

साउथ सुपरस्टार प्रभासचा बहुचर्चित सिनेमा ‘साहो’ नुकताच प्रदर्शित झाला. प्रभासच्या या चित्रपटाची चाहत्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. अखेर तो रिलीज झाला. पण रिलीज होताच एका वादात सापडला. होय, एका बॉलिवूड अभिनेत्रीने या चित्रपटाच्या मेकर्सवर चोरीचा आरोप केला आहे. ही बॉलिवूड अभिनेत्री कोण तर लिसा रे.
लिसाने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित प्रभासच्या या सिनेमावर टीका केली आहे. या पोस्टमध्ये तिने ‘साहो’च्या मेकर्सवर शिलो शिव सुलेमान यांच्या आर्टवर्कची कॉपी केल्याचा आरोप केला आहे. लिसाने इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केलेत. यातील एका फोटो लिसाने ‘साहो’तील एक सीन शेअर केला आहे आणि दुसºया फोटोत समकालीन आर्टिस्ट शिलो शिव सुलेमान यांचे एक चित्र शेअर केले आहे. 


‘हे चुकीचे आहे. याविरोधात बोलायलाच हवे. या मेकर्सला आरसा दाखवून हे गैर असल्याचे सांगावेच लागेल. बिग बजेट चित्रपटात शिलोचे ओरिजनल चित्राशी छेडछाड करून वापरले गेले. ही प्रेरणा नाही तर खुलेआम केलेली चोरी आहे. हे जगात स्वीकार्य नाही. प्रॉडक्शन टीमने चित्राचा वापर करण्याआधी ना आर्टिस्टशी संपर्क केला ना, त्यांची परवानगी घेतली,’ असे लिसाने लिहिले आहे. लिसाच्या या पोस्टवर ‘साहो’च्या मेकर्सनी अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


‘साहो’चे हे पोस्टर ‘बेबी वॉन्ट यू टेल मी’ या गाण्यातील आहे. ‘साहो’ हा सिनेमा सुजीत यांनी दिग्दर्शित केलेला आहे. चार भाषांत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात प्रभास आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत.
  

Web Title: lisa ray accuses saaho makers of plagiarism actress shared photos on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.