आयुष्यभराची आठवण... अभिनेत्री यामी गौतमने शेअर केले लग्नाचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 06:56 PM2021-06-06T18:56:38+5:302021-06-06T18:58:07+5:30

लॉकडाऊनमुळे अगदी 18 लोकांच्या उपस्थितीत यामीने लग्नगाठ बांधली. हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर येथे यामीचा विवाहसोहळा पार पडला. यामीचा पती आदित्य धर हा दिग्दर्शक व गीतकार आहे.

Lifelong memories ... Actress Yami Gautam shared a photo of wedding on twitter | आयुष्यभराची आठवण... अभिनेत्री यामी गौतमने शेअर केले लग्नाचे फोटो

आयुष्यभराची आठवण... अभिनेत्री यामी गौतमने शेअर केले लग्नाचे फोटो

googlenewsNext
ठळक मुद्देयामी आणि आदित्यनं आपलं नातं सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. दोघांनाही एकमेकांवर प्रेम आहे हे कुणालाही कळू दिलं नाही.

मुंबई - अभिनेत्री आणि जाहीरात फेम यामी गौतम 4 जूनला आदित्य धर याच्यासोबत गुपचूप लग्नबंधनात अडकली. या विवाह सोहळ्याचा पहिला फोटो समोर आल्यानंतर या लग्नाबद्दल सर्वांना कळले होते. आता, यामीने तिच्या विवाह सोहळ्यांचे फोटो शेअर केले आहेत. हळदीपासून ते वरमाला गळ्यात घालण्यापर्यंतचे फोटो यामीने शेअर केले आहेत. या फोटोवर तिच्या चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या फोटोसह यामीने Lifetime Memmories असे कॅप्शन दिलं आहे. 

लॉकडाऊनमुळे अगदी 18 लोकांच्या उपस्थितीत यामीने लग्नगाठ बांधली. हिमाचल प्रदेशच्या बिलासपूर येथे यामीचा विवाहसोहळा पार पडला. यामीचा पती आदित्य धर हा दिग्दर्शक व गीतकार आहे. आदित्यने काबूल एक्सप्रेस, हाल ए दिल यांसारख्या चित्रपटांची गाणी लिहिली आहेत तर उरी द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले आहे. नवीन वधूच्या रूपात दिसत आहे. साडी, सिंदूर, गळ्यात मंगळसूत्र आणि हातात बांगड्या परिधान केलेली यामी खूप सुंदर दिसत आहे.


यामी आणि आदित्यनं आपलं नातं सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. दोघांनाही एकमेकांवर प्रेम आहे हे कुणालाही कळू दिलं नाही. यामी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारशी बोलत नाही आणि यामुळेच यामी आणि आदित्यच्या लग्नामुळे केवळ चाहतेच नव्हे तर सेलेब्रिटींनाही आश्चर्याचा धक्का बसला.

Web Title: Lifelong memories ... Actress Yami Gautam shared a photo of wedding on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.