संजय दत्तला मुंबईत सोडून मान्यता दत्त मुलांसोबत दुबईत राहतेय वेगळी, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 12:16 PM2022-05-17T12:16:12+5:302022-05-17T12:17:54+5:30

Sanjay Dutt: संजय दत्तची पत्नी मान्यता दत्त (Manyata Dutt) गेल्या २ वर्षांपासून दुबईत राहते आहे. यामागचे कारण नुकतेच समोर आले आहे.

Leaving Sanjay Dutt in Mumbai, Mynata Dutt lives separately in Dubai with her children, because you will be annoyed by reading | संजय दत्तला मुंबईत सोडून मान्यता दत्त मुलांसोबत दुबईत राहतेय वेगळी, कारण वाचून व्हाल हैराण

संजय दत्तला मुंबईत सोडून मान्यता दत्त मुलांसोबत दुबईत राहतेय वेगळी, कारण वाचून व्हाल हैराण

googlenewsNext

८०च्या दशकापासून अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) हिंदी सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहे. त्यांच्या दमदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. नुकताच तो केजीएफ २ (KGF 2) चित्रपटात झळकला. या चित्रपटात त्याने साकारलेला अधीराला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. संजय दत्त त्याच्या अभिनयापेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. पण सगळ्यात त्याच्या लव्ह लाईफ आणि वैवाहिक आयुष्याबद्दल. अभिनेत्याने तीन लग्नं केली आहेत. पहिले लग्न ऋचा शर्मासोबत, दुसरे लग्न रिया पिल्लईशी आणि तिसरे लग्न मान्यता दत्तसोबत. मात्र गेल्या २ वर्षांपासून मान्यता (Manyata Dutt) दुबईत राहते. मान्यताच्या दुबईला जाण्याचे कारण खुद्द संजय दत्तनेच सांगितले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संजय दत्तला मान्यता आणि त्याच्या मुलांचे दुबईत राहण्याचे कारण विचारण्यात आले. या प्रश्नावर संजय म्हणाला की, त्याची मुले आणि मान्यता यांना तिथे राहणे आवडते. ते लोक मुंबईतही राहू शकत असले तरी त्यांना दुबईत राहून अधिक आनंद मिळतो. संजय दत्तची दोन्ही मुलं दुबईच्या शाळेत शिकतात, तर मान्यता दत्तनेही तिथे आपला व्यवसाय सुरू केला आहे.


अनेकदा कामातून वेळ मिळाल्यावर संजय दत्त आपल्या मुलांना आणि मान्यताला भेटण्यासाठी दुबईला गेल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. त्याचवेळी दुबईतील संजयच्या कुटुंबासोबतचे फोटोही समोर आले आहेत. त्याचबरोबर संजय दत्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या मुलांसोबत दुबईत घालवणार आहे.

Web Title: Leaving Sanjay Dutt in Mumbai, Mynata Dutt lives separately in Dubai with her children, because you will be annoyed by reading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.