laxmmi bomb raghava lawrence walked out from akshay kumars film due to creative differences | अक्षय कुमारला ‘जोर का झटका’; पोस्टर रिलीज झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी दिग्दर्शकाने सोडला सिनेमा!
अक्षय कुमारला ‘जोर का झटका’; पोस्टर रिलीज झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी दिग्दर्शकाने सोडला सिनेमा!

ठळक मुद्देया चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो.

कालच शनिवारी अक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या आगामी चित्रपटाचे फर्स्ट लूक समोर आले आणि दुस-याच दिवशी एक धक्कादायक बातमी येऊन धडकली. ‘लक्ष्मी बॉम्ब’ हा चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कंचना 2’ या तामिळ चित्रपटाचा आॅफिशिअल रिमेक आहे. ‘कंचना 2’ हा चित्रपट दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांनी दिग्दर्शित केला होता. तेच याचा रिमेक अर्थात ‘लक्ष्मी बॉम्ब’ दिग्दर्शित करणार होते. पण पोस्टर प्रदर्शित झाल्याच्या काही तासांतच त्यांनी ‘लक्ष्मी बॉम्ब’मधून अंग काढून घेतले.
होय, ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या क्रिएटीव्ह टीमसोबत झालेल्या काही मतभेदांमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे कळतेय. राघव यांनी आपल्या सोशल अकाऊंटवर एक नोट शेअर करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.‘ मित्रांनो, जिथे तुमचा आदर होत नाही, त्या घरात जायचे नाही, अशी तामिळमध्ये एक म्हण आहे. माझ्यामते, पैसा आणि ऐश्वर्य यापेक्षा आत्मसन्मान महत्त्वाचा आहे. याचमुळे कंचनाचा रिमेक ‘लक्ष्मी बॉम्ब’मधून बाहेर पडण्याचा निर्णय मी घेतलाय. मी कुठलेही एक कारण देणार नाही. कारण खूप सारी कारणे आहेत. एक कारण म्हणजे, मला अंधारात ठेवून चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले गेले. यासंदर्भात त्यांना माझ्याशी चर्चा करण्याची गरजही वाटली नाही. तिसºया व्यक्तिने मला याबद्दल माहिती दिली. एका दिग्दर्शकासाठी ही दु:खद गोष्ट आहे. एक टीकाकार या नात्याने मला चित्रपटाचा फर्स्ट लूक अजिबात आवडला नाही, ’असे राघव यांनी लिहिले आहे.
अद्याप अक्षय वा त्यांच्या टीमकडून याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. या चित्रपटात अक्षयसोबत कियारा अडवाणी प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. यामध्ये अमिताभ बच्चनसुद्धा भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे.


Web Title: laxmmi bomb raghava lawrence walked out from akshay kumars film due to creative differences
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.