late vinod khanna brother pramod khanna will play prajapati pandey in dabangg 3 | ‘दबंग 3’मध्ये ‘हा’ अभिनेता बनणार सलमान खानचा बाबा! विनोद खन्नांशी आहे खास कनेक्शन!!
‘दबंग 3’मध्ये ‘हा’ अभिनेता बनणार सलमान खानचा बाबा! विनोद खन्नांशी आहे खास कनेक्शन!!

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वीच सलमानने ‘दबंग 3’ 20 डिसेंबर 2020ला रिलीज होणार असल्याचे जाहीर केले होते.

‘भारत’ या चित्रपटानंतर सलमान खानदबंग 3’ च्या शूटींगमध्ये बिझी झाला आहे. या चित्रपटात सलमान पुन्हा एकदा इन्स्पेक्टर चुलबुल पांडेच्या आयकॉनिक भूमिकेत दिसणार आहे. साहजिकच चुलबुल पांडेला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता या चित्रपटाबद्दल आणखी एक ताजी बातमी आहे. होय, ‘दबंग 3’मध्ये चुलबुल पांडेचा बाबा कोण साकारणार, याबद्दलचे ताजे अपडेट आहे.  
‘दबंग’ आणि  ‘दबंग 2’मध्ये अभिनेते विनोद खन्ना यांनी सलमानच्या वडिलांची भूमिका साकारली होती. मात्र आज विनोद खन्ना आपल्यात नाहीत. 2017 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यामुळे  ‘दबंग 3’मध्ये सलमानच्या वडिलांची भूमिका कोण साकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. तर आता तेही स्पष्ट झाले आहे. खुद्द सलमानने याबाबतचा खुलासा केला आहे.  त्यानुसार,‘दबंग 3’ मध्ये विनोद खन्ना यांनी साकारलेली सलमानच्या वडिलांची म्हणजेच प्रजापति पांडे यांची भूमिका  प्रमोद खन्ना साकारणार आहेत. विनोद खन्ना आणि प्रमोद खन्ना जवळपास सारखेच दिसतात. त्यामुळे प्रमोद खन्ना यांची निवड या भूमिकेसाठी करण्यात आली आहे.
प्रमोद खन्ना हे दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांचे भाऊ आहेत. सलमानने प्रमोद खन्ना यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत सलमानसोबत सोनाक्षी सिन्हा आणि ‘दबंग 3’चा दिग्दर्शक प्रभु देवा दिसत आहेत. तिघे मिळून प्रमोद खन्ना यांची ओळख करून देत आहेत.

‘दबंग’मध्ये दाखवल्यानुसार, चुलबुल पांडेची आई (डिम्पल कपाडिया) प्रजापती पांडेशी दुसरे लग्न करते. मक्खी (अरबाज खान) हा चुलबुलचा सावत्र भाऊ असतो. पहिल्या पार्टमध्ये चुलबुलच्या आईचे निधन होते. ‘दबंग 2’मध्ये  प्रजापती पांडेची व्यक्तिरेखा दिसली होती. पण विनोद खन्नाच्या निधनानंतर ‘दबंग 3’मध्ये प्रजापती पांडेची व्यक्तिरेखा दिसणार की नाही, याबद्दल अनेक अंदाज बांधले गेले होते. पण आता विनोद खन्ना याचे बंधू ही भूमिका साकारणार हे स्पष्ट झाले आहे.


 


Web Title: late vinod khanna brother pramod khanna will play prajapati pandey in dabangg 3
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.