लारा दत्ता झाली होती या गोष्टीमुळे भावूक,वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 02:38 PM2020-09-11T14:38:46+5:302020-09-11T14:39:14+5:30

ईशा गुप्ता हे पत्र वाचत असताना लाराच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू येत होते. या पत्राने उपस्थित असलेल्या रसिकांना देखील भावूक केले, त्यांनी टाळ्या वाजवून आपली भावना व्यक्त केली होती.

Lara Dutta Emotional When She Shared her Relationship With Her father | लारा दत्ता झाली होती या गोष्टीमुळे भावूक,वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

लारा दत्ता झाली होती या गोष्टीमुळे भावूक,वाचून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

googlenewsNext

आई मुलाचं हे नातं अनोखं असतं... मात्र बाप-लेकीचं नातंही थोडं खासच... असंच काहीसं लारा दत्ताचे तिच्या वडिलांसह होते. बाप लेकीचं नातं घट्ट आणि तितकंच प्रेमळ असतं हे साऱ्यांनाच माहिती आहे.पप्पा.. हा शब्द कदाचित लहान असेल, पण त्याचा प्रभाव दीर्घकालीन व शक्तिशाली आहे. तुम्ही वडिलांना 'पप्पा' म्हणून मोठ्याने हाक मारता, तेव्हा तुम्हाला तुमच्या जीवनातील त्यांचे महत्त्व समजते. एका रिएलिटी शो दरम्यान एका हृदयस्पर्शी पत्राने तिच्या डोळ्यांत अश्रू आले होते.  या पत्रामधील तिच्या वडिलांच्या शब्दांनी लाराच्या बालपणीच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला. 

लारा लहान असताना एकदा भारतीय सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरमध्ये बसली असतानाची एक निरागस आठवण त्यांनी सांगितली. या आठवणीने प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श केला. तिच्या वडिलांच्या पत्रामध्ये लिहिले होते, ''जेव्हा तुला मिस युनिव्हर्सचा क्राऊन मिळाला, तेव्हा तू माझ्यासोबतच संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अशी कामगिरी केलीस. संपूर्ण देश तुझे कौतुक करत होता, हे पाहून माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आले होते. लारा, तू फक्त चेह-यानेच नव्हे, तर मनातून देखील खूप सुंदर आहेस. मला वाटते तुझ्यासारखी मुलगी सर्वांना असो, पण प्रत्येक जन्मामध्ये फक्त तुच माझी मुलगी असली पाहिजे.''

ईशा गुप्ता हे पत्र वाचत असताना लाराच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू येत होते. या पत्राने उपस्थित असलेल्या रसिकांना देखील भावूक केले, त्यांनी टाळ्या वाजवून आपली भावना व्यक्त केली होती. आपले प्रेम व्यक्त करत आणि सर्व वडिलांना संदेश देत ती म्हणाली, ''माझे वडिलांसोबत दृढ नाते आहे. मला वाटते की मी माझ्या वडिलांची मुलगी नसून मुलगा आहे.

 

माझे वडिल भारतीय वायूसेनेमध्ये होते आणि ते इंदिरा गांधी यांचे वैमानिक होते. ते तीन हृदयाघातांमधून वाचले आहेत आणि त्यापैकी मी दोन हृदयाघात प्रत्यक्षात पाहिले आहेत. माझ्यासाठी ते खरे फाइटर आहेत. त्यांनी मला कधीच हार न मानण्याची आणि आपल्या मार्गात येणा-या प्रत्येक आव्हानांचा सामना करण्याची शिकवण दिली.'' ती पुढे म्हणाली, ''वडिलांचे आपल्या जीवनात एक खास स्थान असते. आपण आज जे कोणी आहोत, ते केवळ त्यांच्यामुळेच आणि त्यांनी केलेल्या त्यागांमुळे. माझ्या वडिलांना आणि कुटुंबांचे प्रबळ आधारस्तंभ असलेल्या सर्व वडिलांना माझा सलाम.''

वेबविश्वातून लारा पुन्हा रसिकांच्या भेटीला

'हंड्रेड' नावाच्या वेबसिरीजमधून लारा पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला आली होती. या वेबसिरीजमध्ये लारा दत्ता एसीपी सौम्या शुक्लाच्या भूमिकेत दिसली. या भूमिकेत परफेक्शन आणण्यासाठी महिला पोलिसांकडून तिने खास टीप्स घेतल्या होत्या. 'सैराट' गर्ल रिंकू राजगुरु आणि लारा दत्ता यांची केमिस्ट्री रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली.  स्वित्झर्लंड एकदा तरी पाहण्याचे स्वप्न उराशी बाळगणारी रिंकूला अचानक ब्रेन ट्युमरचा आजार होतो. अगदी जगण्यासाठी कमी वेळ तिच्यासाठी असतो. अशात ती पोलिस इन्सपेक्टर बनलेली लारा दत्तासह काम करायला सुरूवात करते आणि त्यानंतर कशा रितीने तिच्या स्वप्नांना ती भरारी देते अशा आशयाची ही कथा  होती.

Web Title: Lara Dutta Emotional When She Shared her Relationship With Her father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.