Most search Google List : ललित मोदी सुष्मिता सेन हे कपल बनले 'मोस्ट सर्च' सेलिब्रिटी; गुगलने जाहीर केली यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 09:06 AM2022-12-08T09:06:29+5:302022-12-08T09:06:42+5:30

२०२२ चा शेवटचा महिना सुरु आहे. गुगलवर सर्वात जास्त सर्च झालेल्या प्रसिद्ध व्यक्तींची यादी जाहिर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मोस्ट सर्चच्या यादीत आहेत.

lalit-modi-sushmita-sen-most-search-celebs-in-india-google-flashes-top-10-list | Most search Google List : ललित मोदी सुष्मिता सेन हे कपल बनले 'मोस्ट सर्च' सेलिब्रिटी; गुगलने जाहीर केली यादी

Most search Google List : ललित मोदी सुष्मिता सेन हे कपल बनले 'मोस्ट सर्च' सेलिब्रिटी; गुगलने जाहीर केली यादी

googlenewsNext

२०२२ चा शेवटचा महिना सुरु आहे. गुगलवर सर्वात जास्त सर्च झालेल्या प्रसिद्ध व्यक्तींची यादी जाहिर केली आहे. आणि यात चक्क सुष्मिता सेन चे नाव आहे. हे तर होणारच होतं. आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांच्यासोबतच्या तिच्या नात्याची चर्चा जोरदार झाली होती. तसोच त्यांचे फोटोही व्हायरल झाले होते. त्यांच्या बातम्यांनी इंटरनेटवर अक्षरश: धुमाकुळ घातला होता. स्वत: ललित मोदींनीच हे फोटो शेअर केले होते आणि प्रेमाची कबुली दिली होती.

ललित मोदी ४ थ्या स्थानावर

गुगलने जाहिर केलेल्या यादीत ललित मोदी हे ४ थ्या स्थानावर आहेत तर सुष्मिता सेन ५ व्या स्थानावर आहे. १४ जुलै ला दोघांचे हॉलिडेचे फोटो पोस्ट करत ललित मोदींनी प्रेमाची कबुली दिली. तसंच ते लग्न देखील करु शकतात असा क्लु सुद्धा दिला. त्यांच्या फोटो वरन इंटरनेटवर चांगलाच धुमाकुळ झाला होता. धडाधड मीम्स बनवले जात होते. ट्रोलिंग होत होते. साहजिकच या कारणामुळे दोघेही गुगलच्या मोस्ट सर्च लिस्टमध्ये आले आहेत. 

गुगलची यादी 

१.नुपुर शर्मा
२. द्रौपदी मुर्मु
३.ऋषि सुनक
४. ललित मोदी
५. सुष्मिता संन 
६. अंजली अरोरा 
७. अब्दु रोझिक 
८. एकनाथ शिंदे
९. प्रवीण तांबे 
१०. एम्बर हर्ड 

गुगलच्या यादीत आपल्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे.एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह गुवाहाटी ला जाण्याचा जो पराक्रम केला होता त्यातुन त्यांनाही अनेक जणांनी सर्च केल्याचं दिसून येतंय.

Web Title: lalit-modi-sushmita-sen-most-search-celebs-in-india-google-flashes-top-10-list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.