kunal khemu web series abhay director samar sheikh leave now | OMG! ‘अजब’ कुणाल खेमूचे ‘गजब’ कारनामे!!

OMG! ‘अजब’ कुणाल खेमूचे ‘गजब’ कारनामे!!

ठळक मुद्देकुणाल खेमूने बालकलाकार म्हणून आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरूवात केली होती. ‘गुल गुलशन’ या दूरदर्शनवरील शोमध्ये तो बालकलाकार म्हणून झळकला होता.

बालकलाकार म्हणून अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवणारा अभिनेता कुणाल खेमू हिंदी सिनेमाचा ‘हिरो’ बनता बनता राहिला. खरे सांगायचे तर हिंदी सिनेमातून कुणालचे कधीच ‘पॅक अप’ झालेय. पण नखरे दाखवायची कुणालची एक सवय मात्र अद्यापही गेलेली नाही.
हाताला फारसे काम नसताना एका डिजिटल स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने कुणालला ‘अभय’ या वेबसीरिजमध्ये संधी दिली. पण ‘अभय’च्या सेटवरून ज्या काही बातम्या ऐकायला येत आहेत, त्या कुणालसाठी ‘धोक्याची घंटा’ ठरण्याचीच शक्यता अधिक आहे.


छोट्या पडद्यावर अनेक हॉरर व थ्रीलर शोचे निर्माते बी. पी. सिंह यांनी या वेबसीरिजसाठी आधी किकू गुलाटी यांना दिग्दर्शक म्हणून निवडले. शूटींग सुरु झाले. पण कथितरित्या कुणाल आणि किकूचे वाजले. मग काय, कुणालचे किकूसोबत पटत नाही म्हणल्यावर बी.पी सिंह यांनी केन घोष यांना दिग्दर्शक म्हणून आणले. केन घोष काम सुरु करणार अशात कुणाल स्वत: या सीरिजच्या दिग्दर्शनासाठी समर शेख यांना घेऊन आला. ‘बॉबी जासूस’ बनवणा-या समर शेख यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. पण आता समर शेख हेही ‘अभय’च्या टीमच्या कामाची पद्धत पाहून वैतागल्याची खबर आहे. त्यामुळे त्यांनीही  ही वेबसीरिज सोडण्याचा निर्णय घेतल्याचे कळतेय.   एकंदर काय तर कुणालची बुडती नौका आणखी बुडताना दिसू लागलीय.


कुणाल खेमूने बालकलाकार म्हणून आपल्या अ‍ॅक्टिंग करिअरची सुरूवात केली होती. ‘गुल गुलशन’ या दूरदर्शनवरील शोमध्ये तो बालकलाकार म्हणून झळकला होता. यानंतर राजा हिंदुस्तानी, जख्म, भाई, हम हैं राही प्यार के अशा अनेक चित्रपटात बालकलाकार म्हणून तो दिसला. २००५ मध्ये कलयुग या चित्रपटातून त्याने लीड अ‍ॅक्टर म्हणून डेब्यू केला.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kunal khemu web series abhay director samar sheikh leave now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.