kriti sanon and kartik aaryan starrer film luka chuppi official trailer | कार्तिक आर्यन व क्रिती सॅननची ‘लुकाछुपी’; ट्रेलर पाहिलातं?
कार्तिक आर्यन व क्रिती सॅननची ‘लुकाछुपी’; ट्रेलर पाहिलातं?

ठळक मुद्देदिनेश विजान निर्मित हा चित्रपट सिनेमेट्रोग्राफर लक्ष्मण उतेकरने दिग्दर्शित केला आहे. क्रिती व कार्तिकशिवाय अपारशक्ती खुराणा, पंकज त्रिपाठी, विनय पाठक यात महत्त्वपूर्ण भूमिका वठवताना दिसणार आहे.

‘हिंदी मीडियम’ आणि ‘स्त्री’सारखे धमाकेदार चित्रपट दिल्यानंतर मडॉक फिल्म ‘लुकाछुपी’ हा नवा धमाकेदार चित्रपट घेऊन येणार आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन व क्रिती सॅनन ही जोडी प्रथमच प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. गेल्या काही दिवसांत या चित्रपटाचे अनेक पोस्टर्स रिलीज झालेत आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढली. आता ‘लुकाछुपी’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. 


२ मिनिट ४९ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये अनेक मजेशीर डायलॉग्स आहेत. जे ऐकल्यानंतर तुम्ही तुमचे हसू रोखू शकणार नाही. लग्नासाठी उतावीळ असलेला कार्तिक गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहे. तो लग्नासाठी क्रितीला प्रपोजही करतो. पण क्रिती त्याला लिव्ह इनमध्ये राहण्याचा पर्याय सुचवते. यानंतर दोघांचे नाते चांगलेच गुंतते. इतके की, पुढे दोघेही खोट्या लग्नाच्या खोट्या बाता मारताना दिसतात.
दिनेश विजान निर्मित हा चित्रपट सिनेमेट्रोग्राफर लक्ष्मण उतेकरने दिग्दर्शित केला आहे. क्रिती व कार्तिकशिवाय अपारशक्ती खुराणा, पंकज त्रिपाठी, विनय पाठक यात महत्त्वपूर्ण भूमिका वठवताना दिसणार आहे. क्रिती कार्तिकचा हा रोमॅन्टिक कॉमेडी सिनेमा येत्या १ मार्चला प्रदर्शित होतोय. याच दिवशी सुशांत सिंग राजपूतचा ‘सोन चिरैया’ आणि अर्जुन कपूर व परिणीती चोप्राचा ‘संदीप और पिंकी फरार’ हे दोन चित्रपट रिलीज होत आहे. या तिन्ही चित्रपटात कोण बाजी मारतो, ते पुढे बघूच. तोपर्यंत तुम्ही ‘लुकाछुपी’चा ट्रेलर बघा आणि कसा वाटला ते जरूर कळवा.

Web Title: kriti sanon and kartik aaryan starrer film luka chuppi official trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.