बॉलिवूड अभिनेत्री क्रिती खरबंदा सध्या आगामी चित्रपट हाऊसफुल ४, पागलपंती, चेहरे व तमीळ चित्रपट वानमध्ये बिझी आहे. तिचं म्हणणं आहे की तिला कधी अभिनेत्री बनायचं नव्हतं. 

आयएएनएसशी बोलताना क्रिती खरबंदाने सांगितलं की, मला कधी अभिनेत्री बनायचं नव्हतं. मला लग्न करायचं होतं आणि मुलं बाळ असा संसार थाटायचा होता. 


ती पुढे म्हणाली की, मी चित्रपटाची निवड भाषेनुसार करत नाही. जेव्हा मी अभिनय क्षेत्रात काम करायला सुरूवात केली तेव्हा दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतून बॉलिवूडमध्ये येण्याचा मार्ग मिळेल असा कधी विचार केला नव्हता. तसेच बॉलिवूड व टॉलिवूडमध्ये कोणताही भेदभाव करत नाही. दोन्ही इंडस्ट्रीत समान काम मी करते.


क्रितीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर यापूर्वी तिने बॉलिवूड चित्रपट गेस्ट इन लंदन, शादी में जरूर आना, कारवां व यमला पगला दीवाना फिर सेमध्ये दिसली होती.

क्रितीला शादी में जरूर आना चित्रपटातून लोकप्रियता मिळाली होती. या चित्रपटात तिच्यासोबत राजकुमार राव मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाची कथा लव्हस्टोरीवर आधारीत होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता.

क्रितीने दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत गुगली, सुपर रंगा, ब्रुस लीःद फायटर यासारख्या चित्रपटात काम केलं आहे. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kriti Kharbanda never wanted to become an actress wanted to get married

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.