टायगर श्रॉफने बहीण कृष्णाचा फोटो पाहून दिली अशी कमेंट, वेधले सा-यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2020 08:00 PM2020-11-19T20:00:00+5:302020-11-19T20:00:00+5:30

नेहमी स्टनिंग लूकमध्ये दिसणारी कृष्णा आपल्या भावाप्रमाणे दबंग आहे. टायगर वडिलांच्या पाउलावर पाऊल ठेवत फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला. त्याने अ‍ॅॅक्शन स्टार म्हणून स्वत:ची वेगळी ओळख बनवली. पण जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा मात्र कायम पडद्यामागे राहणे पसंत करते.

krishna shroff hot photos tiger shroff comment caught Everyone Eyeball | टायगर श्रॉफने बहीण कृष्णाचा फोटो पाहून दिली अशी कमेंट, वेधले सा-यांचे लक्ष

टायगर श्रॉफने बहीण कृष्णाचा फोटो पाहून दिली अशी कमेंट, वेधले सा-यांचे लक्ष

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारं एक कपल म्हणजे जॅकी श्रॉफची लेक आणि तिचा बॉयफ्रेंड एबन हॅम्स. नेहमी दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे. खुद्द कृष्णाच रोमँटीक फोटो सोशल मीडियावर शेअर करत लक्ष वेधून घ्यायची. तिच्या या फोटोंमुळे अनेकदा जॅकी श्रॉफ आणि टायगर श्रॉफ यांच्यावरही नेटीझन्स टीका करताना दिसायचे. मात्र आता कृष्णाचे ब्रेकअप झाल्याचे समोर आले आहे. स्वत:च्या इन्स्टाग्रामवरचे एबनसोबतचे सर्व फोटोही डिलीट केलेत.

एबन हा एक आॅस्ट्रेलियन बॉस्केटबॉल प्लेयर आहे. एका मुलाखतीत कृष्णाने तिच्या आयुष्यात एक व्यक्ती असल्याची कबुली दिली होती. मी ज्याच्यासोबत आहे, आनंदी आहे. मला काहीही लपवण्याची गरज नाही, असे ती म्हणाली होती. यानंतर सोशल मीडियावर एबनसोबतचे अनेक फोटो तिने शेअर केले होते.


खुद्द कृष्णानेच सोशल मीडियावर तिच्या ब्रेकअपविषयी सांगितले आहे. कृष्णा ब्रेकअपमुळे निराश असली तरीही तिचे प्रेम विसरण्याचा प्रयत्न करते. यात भाऊ टायगर श्रॉफही तिला .यातून बाहेर काढण्यास मदत करत असल्याचे पाहायला मिळतंय. नुकतेच एका कृष्णाच्या एका फोटोवर टायगरने कमेंट करत बहीणीचे कौतुक केले आहे. 

टायगरची याच कमेंटने चाहत्यांचेही लक्ष वेधून घेतले आहे.टायगरने कमेंट केलेल्या फोटत कृष्णा लाल रंगाच्या बिकीनीत पाहायला मिळतंय. नेहमीप्रमाणे ग्लॅमरस अंदाजातला हा फोटो आहे.  त्यामुळे कृष्णा तिच्या या हटके अंदाजामुळेही चर्चेचा विषय ठरत आहे. पहिल्यांदाच कृष्णा ग्लॅमरस बिनधास्त आणि बोल्ड अंदाजात दिसली असे नाही. तर या आधीही ती नेहमीच आपले विविध अंदाजातील फोटो शेअर करत चाहत्यांची वाहवा मिळवत होती. 


नेहमी स्टनिंग लूकमध्ये दिसणारी कृष्णा आपल्या भावाप्रमाणे दबंग आहे. टायगर वडिलांच्या पाउलावर पाऊल ठेवत फिल्म इंडस्ट्रीमध्ये आला. त्याने अ‍ॅॅक्शन स्टार म्हणून स्वत:ची वेगळी ओळख बनवली. पण जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा मात्र कायम पडद्यामागे राहणे पसंत करते.

Web Title: krishna shroff hot photos tiger shroff comment caught Everyone Eyeball

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.