ठळक मुद्दे प्रसिद्ध बिझनेसमॅन अशोक यांच्यासोबत तिने लग्न केले. सध्या गुड्डी आपल्या संसारात आनंदी आहे.

गुड्डी मारूती हे नाव आज अनेकांच्या विस्मरणात गेले असले तरी 90च्या दशकातील बहुतांश सर्व चित्रपटप्रेमींना हा चेहरा चांगलाच ओळखीचा. गोलमटोल गुड्डीच्या कॉमेडीवर लोक फिदा होते. गुड्डीने आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. तिचा कॉमिक टाइमिंग जबरदस्त होता. आज याच गुड्डीबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
या गुड्डीचे खरे नाव गुड्डी नाही तर ताहिरा परब आहे. मग तिचे नाव गुड्डी मारूती का पडले, याची एक मजेशीर कहाणी आहे.

गुड्डीचे वडील मारुती परब हे एक अभिनेते आणि दिग्दर्शक होते. 50 व 60 च्या दशकात खान दोस्त, हम सब उस्ताद है, कहीं आर कहीं पार यासारखे चित्रपट त्यांनी साकारले होते. तिची आई कमल परब ही देखील अभिनय क्षेत्रात होती. गुड्डीचे पाळण्यातले नाव ताहिरा होते. पण सगळे लाडाने तिला गुड्डी म्हणायचे.


 
लहान असताना ताहिरा अनेकदा वडिलांसोबत चित्रपटाच्या सेटवर गेली. याच दरम्यान तिला एक बालकलाकार म्हणून ‘जान हाजीर है’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. ही मुलगी कोणाची? अशी विचारणा त्यावेळी अनेक करत. सुप्रसिद्ध दिग्दर्शक मनमोहन देसाई यांना एकदा असेच कुणीतरी तिच्याबद्दल विचारले़ यावर त्यांनी तिचे नाव गुड्डी असल्याचे सांगितले. मग गुड्डी कोणाची मुलगी?  असा प्रश्न त्यांना केला गेला. यावर मारुतीची हे प्रतिउत्तर मिळाले. पुढे गुड्डी मारूती हेच तिचे नाव प्रचलित झाले.
गुड्डी गोलमटोल होती़ अनेक लोक यावरून तिला डिवचत. पण आपल्या याच शरीरयष्टीमुळे  चित्रपटांची ‘टुनटुन’ ही ओळख तिला मिळाली़.

गुड्डीने जवळपास 100 सिनेमांत काम केले. दुल्हे राजा, बीवी नंबर 1, बरसात की एक रात, शोला और शबनम, आशिक आवारा अशा अनेक चित्रपटांत तिने विनोदी भूमिका साकारल्या.

 अशोक सराफ ,रंजना, कुलदीप पवार यांच्यासोबत तिने ‘गुपचूप गुपचूप’ या मराठी सिनेमातही तिने काम केले. 
चित्रपटांशिवाय छोट्या पडद्यावरच्या अनेक मालिकांमध्येही ती झळकली. 2013 मध्ये गुड्डीने मोठा ब्रेक घेतला. यानंतर 2018 मध्ये तिने पुन्हा कमबॅक केले.

 प्रसिद्ध बिझनेसमॅन अशोक यांच्यासोबत तिने लग्न केले. सध्या गुड्डी आपल्या संसारात आनंदी आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: know about comedienne Guddi Maruti-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.