ठळक मुद्देबॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्रीसोबत तुला लैंगिक संबंध ठेवायला आवडतील? या प्रश्नाचे उत्तर कियारा काय देतेय याची उत्सुकता शाहिदला देखील लागली होती. पण क्षणाचाही विलंब न लावता कियाराने सांगितले की, तिला दीपिका पादुकोणसोबत समलैंगिंक संबंध ठेवायला आवडतील.

शाहिद कपूरचाकबीर सिंग हा चित्रपट सध्या चांगलाच गाजत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर खूपच चांगला गल्ला जमवला. हा चित्रपट लवकरच १०० कोटीचा टप्पा पार पाडेल असा अंदाज लावला जात आहे. या चित्रपटातील शाहिद कपूरच्या अभिनयाची चर्चा चांगलीच रंगली आहे. या चित्रपटातील शाहिदचा परफॉर्मन्स हा आतापर्यंतच्या त्याच्या सगळ्यात चांगल्या परफॉर्मन्सपैकी एक असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटासाठी शाहिदचे कौतुक होत आहे. पण त्याचसोबत या चित्रपटातील नायिका कियारा अडवाणीच्या अभिनयाची देखील प्रशंसा केली जात आहे. या चित्रपटातील तिचा अतिशय साधा लूक, तिचा अभिनय सगळेच काही प्रेक्षकांना आवडत आहेत. 

 

 

शाहिद आणि कियारा यांनी कबीर सिंग या चित्रपटाचे प्रमोशन करण्याची एकही संधी सोडलेली नव्हती. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्यांनी अनेक रिअ‍ॅलिटी शोच्या मंचावर हजेरी लावली होती. तसेच या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी त्या दोघांनी एका चॅट शोला उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमाच्या रॅपिड शोमध्ये कियाराने एका प्रश्नाच्या दिलेल्या उत्तराची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या चॅट शोच्या रॅपिट फायर राऊंडमध्ये कियाराला विचारण्यात आले होते की, बॉलिवूडमधील कोणत्या अभिनेत्रीसोबत तुला लैंगिक संबंध ठेवायला आवडतील? या प्रश्नाचे उत्तर कियारा काय देतेय याची उत्सुकता तिच्यासोबत असलेल्या शाहिदला देखील लागली होती. पण क्षणाचाही विलंब न लावता कियाराने सांगितले की, तिला दीपिका पादुकोणसोबत समलैंगिंक संबंध ठेवायला आवडतील.

दीपिका पादुकोणने गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमध्ये आपले एक स्थान निर्माण केले आहे. तिने शाहरुख खानच्या ओम शांती ओम या चित्रपटाद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. बाजीराव मस्तानी, पद्मावत यांसारख्या अनेक चित्रपटांमधील तिच्या भूमिकांचे चांगलेच कौतुक झाले आहे. या चित्रपटांमुळे तिला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग मिळाले आहे. सामान्य लोकच नव्हे तर बॉलिवूडमधील सेलिब्रेटीदेखील दीपिकाच्या अभिनयाच्या आणि तिच्या प्रेमात पडले आहेत असेच आपण कियाराचे हे उत्तर वाचून म्हणू शकतो. 


Web Title: Kiara Advani Wants Deepika Padukone As Her Lesbian Partner
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.