बाबो ! भोजपूरी इंडस्ट्रीत अभिनेता खेसारी लाल यादव सगळ्यात महागडा अभिनेता, एका सिनेमासाठी घेतो इतके मानधन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 04:57 PM2020-07-16T16:57:02+5:302020-07-16T16:58:20+5:30

खेसारी प्रामुख्याने अॅक्शन सिनेमांसाठी ओळखला जातो. ‘हम है हिंदूस्तानी’, ‘दबंग सरकार’, ‘भाग खेसारी भाग’, ‘खिलाडी’, ‘कुली नंबर वन’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे

Khesari Lal Yadav Highest Paid Bhojpuri Actor,See Net Worth and Per Movie Charges | बाबो ! भोजपूरी इंडस्ट्रीत अभिनेता खेसारी लाल यादव सगळ्यात महागडा अभिनेता, एका सिनेमासाठी घेतो इतके मानधन

बाबो ! भोजपूरी इंडस्ट्रीत अभिनेता खेसारी लाल यादव सगळ्यात महागडा अभिनेता, एका सिनेमासाठी घेतो इतके मानधन

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून  सोशल मीडियावर भोजपूरी सिनेसृष्टीतील सुपरस्टार खेसारी लाल यादवच्या नावाची सर्वात जास्त चर्चा ऐकायला मिळत आहे. त्याच्या सिनेमांपासून ते त्याच्या लाईफस्टाइलपर्यंत सगळ्याच गोष्टी जाणून घेण्यात त्याच्या चाहत्यांना रस असतो. तसेच भोजपूरी इंडस्ट्रीत अल्पावधीतच त्याने सा-यांची मनं जिेकली आहेत. त्यामुळे त्याचे प्रत्येक सिनेमा पाहण्यासाठी रसिक आतुर असतात. सोशल मीडियावरही तो खूप सक्रिय असतो. लाखोंमध्ये त्याचे फालोव्हर्स असून तो तिथेही रसिकांचे मनोरंजन करत असतो. त्याचे प्रत्येक व्हिडीओ करोडोंच्या संख्येने पाहिले जातात. त्यामुळे रूपेरी पडद्यावरच नाहीतर सोशल मीडियावरही त्याचा बोलबोला असल्याचे पाहायला मिळते.

भोजपुरीमध्ये तो सर्वात महागडा अभिनेता ठरला आहे. मीडिया रिपोर्टसनुसार, खेसारी लाल एका सिनेमासाठी तब्बल 40 ते 50 लाख रूपये इतके मानधन घेतो. तर स्टेज शो करण्यासाठी 10 ते 15 लाख इतके चार्ज करतो. विशेष म्हणजे भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये इतके मानधन घेणारा तो पहिला अभिनेता ठरला असल्याचे बोलले जाते. त्याचे खरे नाव शत्रुघ्न कुमार यादव आहे. पण या क्षेत्रात आल्यानंतर त्याने त्याच्या नावात बदल करत खेसारी लाल यादव नावाने तो प्रसिद्ध झाला.

खेसारी प्रामुख्याने अॅक्शन सिनेमांसाठी ओळखला जातो. ‘हम है हिंदूस्तानी’, ‘दबंग सरकार’, ‘भाग खेसारी भाग’, ‘खिलाडी’, ‘कुली नंबर वन’ अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. खेसारीचे कुटुंबिय शेतकरी आहेत. त्याला देखील शेतात काम करायला प्रचंड आवडते असं त्याने या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये म्हटलं होते. पुन्हा एकदा त्याचा शेतात काम करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो शेती कशी करायची याबाबत आपल्या चाहत्यांना माहिती देत आहे. त्याच्यासोबत त्याचे गावातील मित्र देखील काम करताना दिसत आहेत.
 

Web Title: Khesari Lal Yadav Highest Paid Bhojpuri Actor,See Net Worth and Per Movie Charges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.