'केजीएफ २'ला मुहूर्त सापडेना! चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा खोळंबले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2021 03:54 PM2021-06-18T15:54:55+5:302021-06-18T15:55:24+5:30

यशचे चाहते 'केजीएफ: चॅप्टर २' मध्ये लाडक्या रॉकी भाईची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

'KGF 2' can't find a moment! The screening of the film resumed | 'केजीएफ २'ला मुहूर्त सापडेना! चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा खोळंबले

'केजीएफ २'ला मुहूर्त सापडेना! चित्रपटाचे प्रदर्शन पुन्हा खोळंबले

googlenewsNext

'केजीएफ: चॅप्टर १'मध्ये सुपरस्टार यशच्या विस्मयकारक प्रदर्शनाने थक्क झाल्यानंतर त्याचे चाहते 'केजीएफ: चॅप्टर २' मध्ये त्यांच्या लाडक्या रॉकी भाईची एक झलक पाहण्यासाठी आतुर झाले आहेत. ‘केजीएफ: चॅप्टर 2’मध्ये यश मुख्य भूमिकेत असून त्याच्यासमोर अभिनेता संजय दत्त असणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. येत्या १६ जुलैला केजीएफ २ रिलीज होणार होता. मात्र आता कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पुन्हा चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहेत. त्यामुळे चाहते नाराज झाले आहेत. 


चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या माहितीनूसार, केजीएफ चॅप्टर २ च्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली आहे. चित्रपटाच्या पोस्ट प्रोडक्शनचे काम सुरु आहे. तसेच थिएटर पुन्हा सुरु झाल्यावर चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या वाढदिवसाची भेट म्हणून केजीएफ चॅप्टर २ चा टीझर रिलीज करण्यात येणार होता. मात्र, प्रेक्षकांचं प्रेम आणि चाहत्यांकडून होत असलेल्या मागणीमुळे चित्रपटाचा टीझर एक दिवस आधीच म्हणजे ७ जानेवारी रोजी रिलीज करण्यात आला. केजीएफ२ च्या टीझरला खूप प्रतिसाद मिळाला होता. 


‘केजीएफ चॅप्टर २’मध्ये अभिनेत्री रविना टंडन एका राजकीय व्यक्तीच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. ‘केजीएफ चॅप्टर – १’ हा चित्रपट ज्या ठिकाणी संपला, तिथूनच पुढे सीक्वलला सुरूवात होत आहे. या सिक्वलमध्ये यशसोबत संजय दत्त आणि रविना टंडन हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

प्रशांत नील दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगू, हिंदी, कन्नड आणि तामिळ या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाच्या रिलीज डेटची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Web Title: 'KGF 2' can't find a moment! The screening of the film resumed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.