का केली ​हिमेश रेशमियाच्या म्युझिक कंपनीच्या सीईओने आत्महत्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2016 12:14 PM2016-12-12T12:14:48+5:302016-12-12T12:44:35+5:30

गायक, संगीत दिग्दर्शक आणि अभिनेता हिमेश रेशमिया याच्या म्युझिक कंपनीचा सीईओ एंडी सिंह याने आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती आहे. ...

Kelly Himesh Reshammiya Music Company CEO commits suicide? | का केली ​हिमेश रेशमियाच्या म्युझिक कंपनीच्या सीईओने आत्महत्या?

का केली ​हिमेश रेशमियाच्या म्युझिक कंपनीच्या सीईओने आत्महत्या?

googlenewsNext
यक, संगीत दिग्दर्शक आणि अभिनेता हिमेश रेशमिया याच्या म्युझिक कंपनीचा सीईओ एंडी सिंह याने आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती आहे. एंडीचा मृतदेह त्याच्या बेडरूममध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. एंडीने आत्महत्या केली त्यावेळी त्याची आई आणि त्याची गर्लफ्रेन्ड घरात होत्या.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,एंडी कौटुंबिक कलहामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तणावात होता. अर्थात आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप उघडकीस आलेले नाही.
पोलिसांच्या मते, एंडीने शनिवारी रात्रीच आत्महत्या केली. लोखंडवालाच्या तारापोर टॉवरमध्ये तो त्याची आई आणि गर्लफ्रेन्डसोबत राहत होता. शनिवारी डिनरनंतर तो अचानक सगळ्यांमधून उठून आपल्या खोलीत गेला. यानंतर बराच वेळ त्याचा दरवाजा बंद होता. एंडीच्या गर्लफ्रेन्डने त्याच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. मात्र आतून काहीही प्रतिसाद आला नाही. यानंतर तिने शेजाºयांना बोलवले. शेजाºयांनी दरवाजा तोडला असता एंडीने पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला. अर्थात एंडीच्या खोलीतून कुठलीही सुसाइड नोट सापडलेली नाही.
 


एंडी विवाहित होता. त्याला एक मुलगीही आहे. पत्नीला घटस्फोत न देता तो गर्लफ्रेन्डसोबत राहत होता. याच कारणामुळे त्यांच्या कुटुंबात नेहमी वाद होत. अर्थात कुठलीही सुसाईड नोट न आढळल्याने या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्यापही कळू शकलेले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला असून यासंदर्भात हिमेश रेशमियाचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. प्रोफेशनल कारणाने एंडीने आत्महत्या तर केली नाही, या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.

Web Title: Kelly Himesh Reshammiya Music Company CEO commits suicide?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.