kbc 11 karmvir special show achyuta samant and tapasee pannu unable to tell the meaning of the kumbha | KBC11 मध्ये तापसीला पाहून लोकांना आठवली सोनाक्षी, देऊ शकली नाही सोप्या प्रश्नाचे उत्तर
KBC11 मध्ये तापसीला पाहून लोकांना आठवली सोनाक्षी, देऊ शकली नाही सोप्या प्रश्नाचे उत्तर

ठळक मुद्दे डॉ. अच्युत सामंत हे ओडिसामधील  केआयएसएस (KISS ) या संस्थेचे  संस्थापक आहेत.

कौन बनेगा करोडपती11 ’च्या शुक्रवारी प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये तापसी पन्नूला हॉट सीटवर बसलेली पाहून अनेकांना सोनाक्षी सिन्हाची आठवण झाली.  होय, ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये आलेली सोनाक्षी रामायणासंबंधित एका सोप्या प्रश्नावर अडखळली होती. यामुळे तिला ट्रोल व्हावे लागले होते. तशीच काहीसी अवस्था तापसीची झाली. तापसी सुद्धा एका साध्यासोप्या प्रश्नाचे उत्तर देण्यात अपयशी ठरली.
‘कौन बनेगा करोडपती11’च्या दर शुक्रवारी प्रसारित होणा-या कर्मवीर एपिसोडमध्ये एपिसोडमध्ये समाजसेवक अच्युत सामंत यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांच्या मदतीसाठी अभिनेत्री तापसी पन्नू सुद्धा या ठिकाणी हजर होती. त्यांची वेळ संपेपर्यंत या दोघांनी मिळून 12.50 लाख रुपये जिंकले. दरम्यान या खेळात विचारल्या गेलेल्या एका सोप्या प्रश्नांचे उत्तर अभिनेत्री तापसी पन्नूला देता आले नाही. ज्यामुळे सर्वांनाच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची आठवण झाली.  


कुंभमेळ्यातील ‘कुंभ’ या शब्दाचा अर्थ काय? असा प्रश्न तापसी व डॉ. अच्युत सामंत यांना विचारण्यात आला होता. पण तापसी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकली नाही. तिला लाईफ लाईनची मदत घ्याची लागली. सध्या तापसी यामुळे ट्रोल होतेय.


 डॉ. अच्युत सामंत हे ओडिसामधील  केआयएसएस (KISS ) या संस्थेचे  संस्थापक आहेत. या संस्थेच्या माध्यमातून ते आदिवासी भागातील अनेक मुलांना मोफत शिक्षण, निवारा आणि जेवण देण्याचे काम मागची अनेक वर्ष करत आहेत. या भागातील मुलांसाठी शिक्षणाची कोणतीही सोय उपलब्ध नाही त्यामुळे तिथल्या मुलांच्या आयुष्यात या संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

Web Title: kbc 11 karmvir special show achyuta samant and tapasee pannu unable to tell the meaning of the kumbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.