बॉलिवूडच्या चिकनी चमेलीची बहीण आहे तिच्याहूनही सुंदर, सईनंतर सलमान करतोय तिला लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 03:13 PM2019-12-30T15:13:18+5:302019-12-30T15:26:50+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूडमध्ये तिच्या डेब्युची चर्चा सुरु होती.

katrina kaifs sister isabelle kaif will do her debut in film kwatha | बॉलिवूडच्या चिकनी चमेलीची बहीण आहे तिच्याहूनही सुंदर, सईनंतर सलमान करतोय तिला लाँच

बॉलिवूडच्या चिकनी चमेलीची बहीण आहे तिच्याहूनही सुंदर, सईनंतर सलमान करतोय तिला लाँच

googlenewsNext

नव्या वर्षात अनेक नवे चेहरे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाले आहे. अभिनेत्री कतरिना कैफची बहीण सुद्धा डेब्यू करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून इसाबेल कैफच्या बॉलिवूड डेब्यूची चर्चा आहे. मात्र तिच्या बॉलिवूड डेब्यूला मुहूर्त सापडत नव्हता अखेर तो सापडला आहे.

इसाबेलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. इसाबेल क्वथा सिनेमातून बी-टाऊनमध्ये पदार्पण करतेय. या सिनेमाच्या मुहूर्ताचा फोटो शेअर करताना तिने एक कॅप्शन सुद्धा लिहिले आहे. यात तिच्यासोबत सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मासोबत क्वथा सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमाचे दिग्दर्शन करण भुतानी करणार आहे. सलमानचे इसाबेलला बॉलिवूडमध्ये लाँच करतोय अशी माहिती आहे. 

हा सिनेमा आर्मीतील सत्य घटनेवर आधारित आहे. आयुष शर्मा यात आर्मी ऑफिसरची भूमिका साकारताना दिसणार आहे. चॉकलेट बॉयच्या इमेजमधून बाहेर पडण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून या भूमिकेसाठी तो मेहनत करतोय.

आयुष दिवसातील २-३ तास व्यायाम करत आहे. आयुष हा टायगर श्रॉफचे ट्रेनर असलेल्या विक्रम स्वैनकडून ट्रेनिंग घेणार आहे. आयुष शर्माने लवरात्री सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते मात्र त्याच्या या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर म्हणावे तसे यश लाभले नाही. त्यामुळे या सिनेमाकडून आयुषला अनेक अपेक्षा असणार आहेत.  याआधी इसाबेल ‘टाईम टू डान्स’ या सिनेमातून डेब्यू करणार अशी चर्चा होती. मात्र आता ती क्वथामधून पदार्पण करत असल्याचे नक्की झाले आहे. 
 

Web Title: katrina kaifs sister isabelle kaif will do her debut in film kwatha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.